Home /News /maharashtra /

चंद्रपूर : पेट्रोल टँकर आणि ट्रक अपघातातील मृतकांचा आकडा वाढला, 9 जणांचा होरपळून मृत्यू

चंद्रपूर : पेट्रोल टँकर आणि ट्रक अपघातातील मृतकांचा आकडा वाढला, 9 जणांचा होरपळून मृत्यू

BREAKING: चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, VIDEO

BREAKING: चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, VIDEO

Chandrapur Accident updates: चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातातील मृतकांचा आकडा वाढला आहे.

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 20 मे : चंद्रपूर-मूल महामार्गावर (Chandrapur Mul Highway) अजयपूर येथे झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू (9 died in Petrol Tanker and Truck accident) झाला आहे. अजयपूर गावाजवळ (Ajaypur Village) काल रात्री हा अपघात झाला होता. पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. या अपघातात 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात कोळसा झालाय. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू आहे. लाकूड भरलेल्या ट्रकमधील मयतांची नावे अजय डोंगरे, 30 वर्षे, बल्लारपूर प्रशांत नगराळे, 33 वर्षे, लावारी , नवी दहेली मंगेश टिपले, 30 वर्षे, लावारी, नवी दहेली भैय्यालाल परचाके, 24 वर्षे, लावारी ,नवी दहेली बाळकृष्ण तेलंग, 57 वर्षे, लावारी ,नवी दहेली साईनाथ कोडाप, 40 वर्षे, लावारी, नवी दहेली संदीप आत्राम, 22 वर्षे, कोठारी या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. या अपघाताची माहिती मिळताच मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके रवाना करण्यात आली. मूल-रामनगर पोलिसांची पथके, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू करण्यात आलं. या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटल्याने आग आणखी भडकली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, Chandrapur, Maharashtra News

    पुढील बातम्या