येवले, 14 जुलै : अजित पवार यांनी 9 आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्या सर्व नेत्यांविरोधात दंड थोपटले. येवल्यात सभा घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नव्याने उभा करू असं म्हटलं. तसंच येवल्यात सभेत बोलताना माझी चूक झाली म्हणत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांचे येवल्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. छगन भुजबळ म्हणाले की, पवार साहेब म्हणाले चुकलो पण इथले लोक म्हणाले चुकले नाही. पवार साहेब तुम्ही अशाच चूका करा म्हणजे विकास होईल. मी चार वेळा निवडून आलो पण अशी मिरवणूक निघाली नव्हती. मी जाणार नाही, कोणी मला इथून घालवू शकत नाही. पुढच्या आठवड्यात अजित दादांची सभा सुद्धा होईल. पवार साहेबांनी अजित दादांचा हात धरून ठेवायचा ना. ही वेळ आली नसती. त्यांचे हात धरून काय होणार आहे असं म्हणत भुजबळांनी शरद पवार यांना टोला लगावला. तसंच पक्ष आपला आहे, चिन्ह आपलंच आहे. मतभेद झाले पुढे काय होत बघू असंही ते म्हणाले. कृषिमंत्रिपद गेल्यानंतर अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘मी स्वतः..’ माझ्या स्वागतासाठी भाजप शिवसेना सह सगळ्या पक्षाचे लोक आहेत. उद्योजक,व्यापारी आणि सर्व धर्माचे लोक आज इथे आले आहे. भव्य मिरवणुकी मुळे मी भारावून गेलो. येवल्यात काय माझ्या आयुष्यात देखील इतकी भव्य मिरवणूक झाली नाही. नगरसेवक, महापौर,आमदार मंत्री अशी सगळी पद भोगली. पद आता काही वाटत नाही मात्र ते साधन आहे. मी आपला मनापासून आभारी आहे. येवल्यात एवढी मोठी मिरवणूक कधी निघाली नाही . माझ्या आयुष्यात सुद्धा अशी मिरवणूक निघाली नाही अशा भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादीचा पक्ष, झेंडा आणि निशाणी माझ्या घरातच तयार झाला. समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांनीच त्यावेळी काम केले. मी पहिलाच अध्यक्ष होतो. अनेक बालंट आली, तेलगीचे आले. मंत्रिपदही गेलं. आता ही मागे जेल मध्ये गेलो, काहीच नाही निघाले. खाते जाहीर झाले, मला पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते मिळाले. महायुतीच्या माध्यमातून गरिबांची सेवा करेल. खात्याचा वापर साधन म्हणून करेल. मंत्रिपदाचे अप्रूप काही राहिले नाही पण ते साधन आहे. लोकांचे काम करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठीचे साधन आहे. कोरोना काळात सगळं बंद झाले होते. काळजी करू नका बंद असेल पण माझ्या खात्याचे काम सतत सुरू राहणार आहे असे सांगितले होते. सरकारी यंत्रणेने काम केले असंही छगन भुजबळ म्हणाले. ज्या घरात लाईट नाही, मोरी नाही त्या घरात भुजबळ जन्माला आला. नंतर शिवसैनिक झालो आणि आमदार, महापौर झालो. मतभेद झाले म्हणून शरद पवार यांच्यासोबत गेलो आणि विरोधी पक्षनेता झालो. माझ्या घरावर हल्ला झाला पण मी वाचलो. मी पवार साहेबांच्या सोबत राहणार हे सांगणारा पहिला होतो. मुख्यमंत्री करतो म्हणून अनेकांचे फोन आले पण गेलो नाही. काही लोक मतदान करत होते, जे आता नेते झाले. मी काही विचार केला नाही भूमिका जाहीर केली होती असं भुजबळ यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







