जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Cabinet : कृषिमंत्रिपद गेल्यानंतर अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मी स्वतः..'

Maharashtra Cabinet : कृषिमंत्रिपद गेल्यानंतर अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मी स्वतः..'

मंत्री अब्दुल सत्तार

मंत्री अब्दुल सत्तार

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारमधील खातेवाटपाचा तिढा सुटला असून अखेर खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये अंतर्गत खांदेपालट केल्याचेही पाहायला मिळाले.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर खातेवाटपावरुन चर्चा सुरू होत्या. अखेर हा तिढा सुटला असून खातेवाटप जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केलं. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अंतर्गत खांदेपालट पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खातं काढून घेऊन ते राष्ट्रवादीला देण्यात आलं आहे. यानंतर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अब्दुल सत्तार? अब्दुल सत्तार म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या. अतिवृष्टी असेल किंवा सातत्याचा पाऊस असो, 12 हजार कोटी माझ्या माहितीप्रमाणे आम्ही शेतकरी बांधवांना दिले आहेत. सूर्यफूल आणि कापूस यासाठी एक हजार कोटीची तरतूद केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. बळीराजाच्या मदतीसाठी कृषी विभागाची लोक 16 हजार गावापर्यंत गेले. मंत्रीमंडळातल्या सर्व विभागातील मंत्र्यांनी मला या काळामध्ये मदत केली. शेतकऱ्यांवर जेव्हा अस्मानी संकट येतं, तेव्हा कृषी विभागाची मोठी भूमिका असत. मागील एक वर्षांमध्ये मला वाटत नाही की एवढे वेगवान निर्णय घेणारे सरकार आतापर्यंत कुणाचं असेल. अल्पसंख्याक समाजाच्या एका आमदाराला एवढी मोठी संधी देणे खूप मोठं काम आहे. धनंजय मुंडे तरुण आहेत. काम करण्यामध्ये सक्षम आहेत. माझ्या संकल्पना मी राबवल्या. त्यांच्या संकल्पना ते राबवतील. आमच्या वेळी एक उपमुख्यमंत्री होते, आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. कर्तव्यदक्ष आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून धनंजय मुंडे यांचे मोठे नाव आहे. आपण सरकार म्हणून आपल्या काळात जे जे करतोय ते इतिहासामध्ये कुठेतरी त्याची नोंद केली जाते. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा. शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये हे माझ्यासमोर प्रश्न होते. शेतापासून मार्केट कमिटीपर्यंत शेतकऱ्यांसाठी काय करता येईल ते मी करेल. वाचा - अजितदादा लागले कामाला, खातेवाटपाआधीच अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक, Video व्हायरल अनेक धर्माचे लोक अल्पसंख्याकमध्ये येतात. मुस्लिमपासून ते जैनपर्यंत प्रत्येकासाठी काम करेल. मी अजित पवार यांना विनंती करेल की अल्पसंख्याक समाजासाठी थोडा जास्त निधी वाढून द्यावा. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री मला मदत करेल अशी अपेक्षा आहे. मी अनेक खात्याच्या जबाबदारी आतापर्यंत पार पाडल्या. ग्रामविकास, महसूल, कृषी, संवर्धन व दोनदा राज्यमंत्री राहिलोय. योगायोगाने एका अल्प समाजाच्या माणसाला काम करण्याची संधी मिळाली. पुढच्या निवडणुकीला 14 महिने बाकी आहे. मी नाराज नाही. मी स्वतः विनंती केली होती सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती. ती माझी विनंती त्यांनी मान्य केली. खाते बदलण्यासाठी स्वतः नागपूर अधिवेशनापासून मी विनंती करीत होतो. आज मला जे खातं बदली मिळालं आहे. काम करण्यासाठी संधी मिळाली. या कामांमध्ये एक वर्षांमध्ये चांगलं काम करेल.

News18लोकमत
News18लोकमत

आपण जे काम करतो त्या कामाचा मूल्यमापन करताना दीड वर्षाचा इतिहास माझ्यासमोर आहे. धनंजय मुंडे यांना एक वर्ष बाकी आहे. त्या एका वर्षांमध्ये माझ्यापेक्षा चांगलं काम करतील मला अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काही माहीत नाही. जे काही आहे मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं. मला नवीन जबाबदारी दिली. नवीन जबाबदारी पार पाडताना आपल्याला ज्या ज्या ठिकाणी शेतकरी बांधवाला शेतमजुराला गोरगरिबाला दलित, ओबीसी या सर्व विषयांमध्ये काम करण्यासाठी कॅबिनेटमध्ये सर्व अधिकार असतो. मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो, माझ्याशी चर्चा करून त्यांनी मला हे खाते दिलं आहे. या सरकारमध्ये पहिले दोन पक्ष होते आता तीन पक्ष आलेले आहेत. तीनही मजबूत नेते आहेत, याचा महाराष्ट्राला फायदा होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात