मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ती तरफडत राहिली, किंचाळली, आठ नराधमांनी पिस्तूल रोखत लचके तोडले, व्हिडीओ बनवला आणि.....

ती तरफडत राहिली, किंचाळली, आठ नराधमांनी पिस्तूल रोखत लचके तोडले, व्हिडीओ बनवला आणि.....

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पोलिसांनी सुरुवातीला तपास केला तेव्हा त्यांना पीडितेसोबत इतकी भयानक घटना घडली असेल याची कल्पनादेखील नव्हती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Vaishali, India
  • Published by:  Chetan Patil

पाटणा, 17 सप्टेंबर : देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये काही केल्या घट होताना दिसत नाहीय. देशातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. विशेष म्हणजे विकृती ही कोणत्या थरावर जावून पोहोचेल याची आपण कधी कल्पनादेखील करु शकत नाही, इतकं वाईट आणि विकृत या देशात महिला आणि मुलींसोबत घडताना दिसत आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात तशीच एक भयानक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर फार भयानक आणि अतिशय वाईट घटना घडली आहे. या मुलीवर तब्बल आठ जणांनी मिळून सामूहिक बालत्कार केला. आरोपी इतके विकृत होते की त्यांनी पीडितेवर अत्याचार करतानाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी व्हायरल झालेल्या या व्हिडीओचा तपास केला तेव्हा धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण बिहार राज्य हादरलं आहे. या घटनेची दखल देशभरातील माध्यमांनी घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींना नेमकं काय शिक्षा होते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित घटना ही बिहारच्या वैशाली जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण तपास केला आहे आणि आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सुरुवातीला तपास केला तेव्हा त्यांना पीडितेसोबत इतकी भयानक घटना घडली असेल याची कल्पनादेखील नव्हती. पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केला असता पोलिसांना देखील धक्का बसला. पीडितेवर एक-दोन जणांनी नाही तर तब्बल आठ आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला बंदुकीचा धाक दाखवत आधी अपहरण केलं नंतर जंगलात नेत तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

(स्पा पार्लरमध्ये देहविक्रीचा धंदा, पोलिसांचा छापा पडताच आपत्तीजनक अवस्थेत सापडले तरुण-तरुणी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंत व्हिडीओ पोहोचला. व्हिडीओतील आरोपींची भाषा ऐकून संबंधित व्हिडीओ हा आपल्याच आजूबाजूच्या परिसरातील आहे, अशी जाणीव पोलिसांना झाली. वरिष्ठ पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तैनात केलं. पोलिसांनी तांत्रिकदृष्टीने तपासाला गती दिली आणि दोघांना बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी सुरुवातीला आपल्याला संबंधित प्रकरणाविषयी काही माहिती नाही, असा जबाब दिला. पण पोलिसांनी त्यांची चौकशी केली, त्यांना पोलिसी ख्याका दाखवला तेव्हा आरोपी पटापट बोलू लागले. पीडितेला आरोपी आमोद राय याने पिस्तूलीचा धाक दाखवत जबदरस्ती बाईकवर बसवलं होतं. त्यानंतर आरोपी तिला जंगलात घेवून गेला. तिथे आमोदचे साथीदार रोशन पासवान, ठोटू कुमार आणि इतर पाच जण दबा धरुन बसले होते. आरोपींनी जंगलात पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ आरोपींनी सोशल मीडियावर देखील व्हायरल केला.

आरोपींनी पीडितेवर अत्याचार केल्यानंतर पीडिता कशीतरी आपल्या घरी पोहोचली. तिथे तिने आपल्या कुटुंबियांना सगळा प्रकार सांगितला. तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि पोलिसात तक्रार केली. पोलीस या प्रकरणी तपास करत असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपींना पकडलं आणि सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

First published: