मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री अन् घडला धक्कादायक प्रकार, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री अन् घडला धक्कादायक प्रकार, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातला धक्कादायक व्हिडीओ समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातला धक्कादायक व्हिडीओ समोर

मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले असता अचानक त्यांच्याभोवती लोकांनी गराडा घातला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 18 मार्च : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातला धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी अचानक कार्यकर्ते आणि लोकांची एकच झुंबड उडाली. त्यामुळे पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले असता अचानक त्यांच्याभोवती लोकांनी गराडा घातला. गेटमधून येताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी झाली. एकाच वेळी गर्दी झाल्यामुळे गोंधळ उडाला.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा पुरता फज्जा उडाला. मुखमंत्र्याच्या अंगावर गर्दीचे लोट गेल्याने पोलिसांच्या नियोजनाचे तीन तेरा वाजले. काही लोकांनी ब्रॅरिकेट्स तोडून आत प्रवेश केला. त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी

दरम्यान, नाशिकवरून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळाच्या लाँग मार्च सरकार दखल घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्याच्या एका शिष्टमंडळाने नाशिकच्या कळवण भागातील आदिवासी तालुक्याला भेट दिली आणि शेतकरी, ग्रामस्थ यांच्याधी मागण्यांबाबत चर्चा केली.

(अवकाळीने शेतकऱ्यांना मिळतेय 'सजा', बांधावर न जाता कृषिमंत्र्यांची चालली मजा)

चर्चेनंतर या अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. कमिटीने तालुक्यातील अपूर्णावस्थेतील ओतूर धरण जामशेत धरणाची पाहणी केली. तसंच सुळे वन जमिनी पाहणी केली आहे.

(तेव्हा एका जागेसाठी युती तोडली अन् आज..; जागा वाटपावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला!)

मोर्चेकाऱ्यांनी वन जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी, ओतूर धरण व जामशेत धरणाचे दुरुस्ती करावी, गायरान जमिनीवरील घरे नियमित करावी, वनहक्क दावे निकाली काढावे, आदी प्रमुख मागण्या केल्या होत्या. होती पावसात नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानसभे मध्ये मागण्या झाल्या आज लगेच अंमलबजावणी केली जात आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Nashik