मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साखर झोपेत काळाचा घाला; नाशकात मुसळधार पावसाने घेतला घरात झोपलेल्या पती-पत्नीचा जीव

साखर झोपेत काळाचा घाला; नाशकात मुसळधार पावसाने घेतला घरात झोपलेल्या पती-पत्नीचा जीव

नाशिकच्या वंजारवाडी येथे घराची भिंत कोसळल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छबु गवारी आणि मंदाबाई गवारी असं मयत पती पत्नीचं नाव आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नाशिक 09 सप्टेंबर : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने दैना उडाली आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही तासांच्या झालेल्या पावसाने थैमान घातल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यादरम्यान नाशिकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. जवानांना कडक सॅल्युट! जीव धोक्यात घालून 170 विद्यार्थ्यांची केली सुटका, पाहा PHOTO नाशिकच्या वंजारवाडी येथे घराची भिंत कोसळल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छबु गवारी आणि मंदाबाई गवारी असं मयत पती पत्नीचं नाव आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसात या दाम्प्त्याच्या घराची भिंत कोसळली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मौजे वंजारवाडी येथे पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. छबु सिताराम गवारी आणि पत्नी मंदाबाई छबू गवारी हे दोघंही रात्रीच्या वेळी घरात झोपलेले होते. यादरम्यान मुसळधार पावसात त्यांच्या घराचा पाया ढसाळला. या घटनेत घराची भिंत अंगावर कोसळल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झोपेतच या दोघांवरही काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विघ्नहर्त्याची भेट ठरली अखेरची; दर्शन घेऊन निघताच महिलेसोबत घडलं भयंकर, बाप्पासमोरच सोडलं जग दरम्यान नाशिकमधील आणखी एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यात मुसळधार पाऊस सुरू असतानाच JMCT कॉलेज परिसरात वीज कोसळली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून हे दृश्य थरकाप उडवणारं आहे. दरम्यान हवामान खात्याकडून राज्यात पुढचे दोन दिवस पाऊस होईल असा इशाराही देण्यात आला आहे.
First published:

Tags: Nashik, Rain

पुढील बातम्या