जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विघ्नहर्त्याची भेट ठरली अखेरची; दर्शन घेऊन निघताच महिलेसोबत घडलं भयंकर, बाप्पासमोरच सोडलं जग

विघ्नहर्त्याची भेट ठरली अखेरची; दर्शन घेऊन निघताच महिलेसोबत घडलं भयंकर, बाप्पासमोरच सोडलं जग

विघ्नहर्त्याची भेट ठरली अखेरची; दर्शन घेऊन निघताच महिलेसोबत घडलं भयंकर, बाप्पासमोरच सोडलं जग

नागपूरच्या येथील भेंडे ले-आऊट येथील सार्वजनिक बाल गणेश मंडळाबाहेर एका 80 वर्षीय महिलेसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला. जिवंत तारांच्या संपर्कात आल्याने महिलेला जबर धक्का बसला.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर 09 सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या काळात डेकोरेशन करताना विजेचा धक्का लागून किंवा विसर्जनादरम्यान काहींचा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना आता नागपूरमधून समोर आली आहे. यात गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या आजींना याची कल्पनाही नव्हती की हे दर्शन त्यांच्यासाठी शेवटचं ठरणार आहे. विमानात घडलं भयंकर! …अन् प्रवाशांनी स्वतःलाच टॉयलेटमध्ये कोंडलं, पायलटनेही केलं एमर्जन्सी लँडिग नागपूरच्या येथील भेंडे ले-आऊट येथील सार्वजनिक बाल गणेश मंडळाबाहेर एका 80 वर्षीय महिलेसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला. जिवंत तारांच्या संपर्कात आल्याने महिलेला जबर धक्का बसला. त्यात कमलाबाई रेवडे या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाबाई या कुटुंबासह भेंडे ले-आऊट गणेश उत्सव मंडळात गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर कुटुंबातील सर्व सदस्य त्यांची पादत्राणे परत करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी कमलाबाईंनी जिवंत वायरला जोडलेला लोखंडी रॉड पकडला. त्यानंतर त्यांना जोराचा धक्का बसला. बापरे! कळव्यात वीज कोसळली, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO विजेचा धक्का बसताच कमलाबाई जमिनीवर पडल्या. कमलाबाई यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या कमलाबाईंना याची कल्पनाही नव्हती की हे दर्शन त्यांच्यासाठी शेवटचं ठरणार आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मंगळवारी दुसरी एक घटना समोर आली होती. ज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून गणपतीचे दर्शन घेऊन गावाकडे परत येत असताना लाखांदूरजवळील चप्राड पहाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: death , nagpur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात