नाशिक, 17 जानेवारी : बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फसणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. मुलगी वारंवार घर सोडून पळून जात असल्यामुळे वाद झाला आणि रागाच्या भरात बापाने मुलीचा ओढणीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सिडको परिसरातील अंबड लिंक रोड चुंचाळे शिवारातील रामकृष्ण नगर येथील शिव व्हीला अपार्टमेंट इथंही घटना घडली आहे. रामकिशोर भारती असं आरोपी वडिलांचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित रामकिशोर भारती (वडील) आणि मुलगी ज्योती भारती यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते. आज सकाळी घरी असताना त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर रामकिशोर भारती याचा राग अनावर झाल्याने त्यांनी रागाच्या भरात मुलीचा म्हणजेच ज्योतीचा घरातील ओढणीच्या सह्याने गळा आवळून खून केला.
(विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट)
मुलगी वारंवार घर सोडून पळून जात असल्याने त्यांच्यात वाद झाले आणि याच वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून संशयित रामकिशोर भारती यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत मुलीचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. बापानेच मुलीचा खून केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जालन्यात युवकाची आयशर ट्रकमध्ये गळफास घेवून आत्महत्या
दरम्यान, जालन्यात एका युवकानं आयशर ट्रकमध्येच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेख कलीम शेख उस्मान असं या आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव असून तो शहरातील संजय नगर येथील रहिवासी होता. कलीम हा अंडे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता.
(हेही वाचा - लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष...)
त्यामुळं त्याची या भागात उठ बस होती.. मात्र आज सकाळी राजेश पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रकमध्ये कलीम याने गळफास घेतल्याचं उघडकीस आलं. या घटनेनंतर बघ्यांची गर्दी जमली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.