नाशिक, 16 जानेवारी : विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांच्या नावाने डमी उमेदवार असलेल्या सुधीर सुरेश तांबे यांनी माघार घेतली आहे. एकाच नावामुळे घोळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीला रंगत आली आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ.सुधीर तांबे यांच्या नावाने डमी उमेदवार असलेले डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. एकच सारखे नाव असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण डॉ सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता. डमी उमेदवार असलेले सुधीर तांबे हे मूळचे पनवेल येथील आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांची देखील माघार घेतली आहे. 22 उमेदवारांपैकी आतापर्यंत 2 जणानी माघार घेतली आहे.
तर, धनंजय जाधव यांची देखील माघार घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केल्यानंतर धनंजय जाधव यांची माघार घेतली आहे. धनंजय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्ष श्रेष्ठींच्या विनंतीनंतर मी माघार घेत असल्याचा जाधव यांनी खुलासा केला.
(mlc election : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस; सत्यजित तांबे माघार घेणार का?)
दरम्यान, विधान परिषदेसाठीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी थेट गिरीश महाजन मैदानात आले आहे. महाजन यांचा कोणताही अधिकृत दौरा नाही. पण महाजन हे नाशिकमध्ये अज्ञातस्थळी मुक्कामी आहे. नाशिकमध्ये येऊन महाजन पदवीधर निवडणुकीचे सूत्र हलवणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा मुकाबला रंगला आहे.
(हेही वाचा : अखेर तिढा सुटला; नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत 'मविआ'चा मोठा निर्णय)
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज न भरल्यानं सुधीर तांबेंविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेंचं निलंबन करण्यात आलं आहे. उमेदवारी देऊनही सुधीर तांबेंनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: नाशिक