मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लाथ लागल्याने धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं; तरुणाचा मृत्यू, नागपूर-पुणे गरीबरथमधील घटना

लाथ लागल्याने धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं; तरुणाचा मृत्यू, नागपूर-पुणे गरीबरथमधील घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या घटनेत पायाचा धक्का लागल्याने ट्रेनमध्ये वाद सुरू झाला. या वादात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून खाली फेकलं (Nagpur Crime)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर 26 ऑगस्ट : अतिशय किरकोळ कारणावरुन वाद किंवा हाणामारी झाल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली किंवा ऐकली असतील. मात्र, अनेकदा हे वाद इतके टोकाला पोहोचतात की यातून गंभीर हल्ले तसंच हत्या अशा घटनाही घडतात. नागपुरमधून सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात किरकोळ कारणामुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे.

संतापजनक! ग्राहकाने पिझ्झा-बर्गर घेतलं अन् बदल्यात डिलिव्हरी बॉयला घातली गोळी!

या घटनेत पायाचा धक्का लागल्याने ट्रेनमध्ये वाद सुरू झाला. या वादात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून खाली फेकलं. त्यात या प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूरच्या बुट्टीबोरी ते गुमगाव स्थानकादरम्यान घडली आहे. गरीबरथ या ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेत अकोल्यावरून नागपूरचा उर्स बघण्यासाठी येत असलेला प्रवासी शेख अकबर याचा मृत्यू झाला आहे. मृतकासोबत असलेल्या सह प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून संशयित आरोपी शेख अब्बास याला अटक करण्यात आली आहे.

25 वर्षांचं प्रेम, मृत्यूनंतरही पत्नीला सोडलं नाही; शिक्षकाच्या कृत्यामुळे शेजारच्यांमध्ये दहशत

नेमकं काय घडलं -

रेल्वेमध्ये मोठी गर्दी होती, त्यामुळे अकबर आणि त्याचे मित्र जनरल डब्यात दाराजवळ अन्य काही प्रवाशांसह दाटीवाटीने उभे होते. सकाळी 8 वाजताच्या सुमारास ट्रेन बुटीबोरीजवळ आली असताना शेख अकबर यांचा पाय दुसऱ्या एका तरुणाला लागला. त्यावरून शेख अकबर आणि आरोपींमध्ये वाद झाला. किरकोळ कारणावरुन सुरू झालेला हा वाद इतका वाढला की आरोपीने शेख अकबरला धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं. या घटनेत शेख अकबर यांचा मृत्यू झाला. मात्र, हा सर्व प्रकार घडत असताना अकबरच्या मित्रांसह तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी चेन ओढून गाडी थांबवण्याचा किंवा 139 वर फोन करून मदत मागण्याचा प्रयत्नही केला नाही. अकबरला कोणाचीही मदत मिळाली नाही.

First published:

Tags: Crime news, Murder