जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गर्लफ्रेंडला फिरण्यासाठी हवी होती नवीन मॉडेलची दुचाकी, नागपुरातील प्रियकरानं तब्बल...

गर्लफ्रेंडला फिरण्यासाठी हवी होती नवीन मॉडेलची दुचाकी, नागपुरातील प्रियकरानं तब्बल...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

रमजान उर्फ मुनीर इकराम अन्सारी (19, रा. पाचपावली) असे यातील एका आरोपीचे नाव आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 24 ऑगस्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. चोरीच्याही घटना समोर येत आहेत. नागपुरात आता एकाने गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी दुचाकींच्या चोरीचा प्रकार समोर आला आहे. प्रेयसी आणि गांजावर खर्च करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन व त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाडी पोलिसांनी केली. काय आहे संपूर्ण प्रकरण - रमजान उर्फ मुनीर इकराम अन्सारी (19, रा. पाचपावली) असे यातील एका आरोपीचे नाव आहे. त्याची व त्याच्या अल्पवयीन साथीदाराची चौकशी सुरू आहे. आरोपींकडून दोन लाख रुपये किमतीच्या तब्बल 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वाडी पोलिसांकडे चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. याचदरम्यान, अल्पवयीन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत वाहन सोडून जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी चौकशी करत सीसीटीव्हीच्या मदतीने अल्पवयीन मुलाचा शोध घेतला. त्याच्यावर वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलिसांना संशय बळावला होता. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने रमजान अन्सारीच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोघेही व्यावसायिक वाहनचोर आहेत. त्यांना गांजाचे व्यसन आहे. तसेच गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी ते वाहनचोरी करतात, असे पोलीस तपासात समोर आले आहे. हेही वाचा -  शाळेसमोरुन अपहरण; धावत्या गाडीत 13 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

रमजानच्या गर्ल फ्रेंडला फिरण्यासाठी नवीन मॉडेलची दुचाकी हवी होती. मात्र, ती खरेदी करता न आल्याने आरोपींनी थेट नवीन मॉडेल्स चोरण्यास सुरुवात केली. यूट्युबवरील व्हिडीओ पाहून नवीन दुचाकी अनलॉक करण्याचे धडे घेतले. आरोपी संधी पाहून दुचाकी चोरायचा आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी मित्रांकडे दुचाकी चालवण्यासाठी द्यायचा, अशी माहिती समोर आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार आणि त्यांच्या पथकाने केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात