जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चालक ढाब्यावर गेला, चोरट्यांनी कंटेनर खाली केला, तब्बल 9 लाखांची चहापत्ती चोरली!

चालक ढाब्यावर गेला, चोरट्यांनी कंटेनर खाली केला, तब्बल 9 लाखांची चहापत्ती चोरली!

चालक ढाब्यावर गेला, चोरट्यांनी कंटेनर खाली केला, तब्बल 9 लाखांची चहापत्ती चोरली!

या कंटेनरमध्ये महागडी चहाची पत्ती होती, हे आधीच चोरट्यांना माहिती असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

चांदवड, 09 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून मालवाहू ट्रक आणि कंटेनरमधून सामनाच्या चोरीच्या घटना वाढलेल्या आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये आणखी एका कंटेनरमध्ये चोरीची घटना घडली आहे. चालक ढाब्यावर जेवणासाठी थांबलेला असताना चोरट्यांनी तब्बल 9 लाखांची चहापत्ती गायब केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवडला मुंबई-आग्रा महामार्गांवर चांदवडजवळ ही घटना घडली. जेवण करून थकवा दूर करण्यासाठी चालकाने नेहमी प्रमाणे आपला ट्रक एका ढाब्यावर उभा केला. ढाब्यावर जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर चालकाने थोडी विश्रांती केली. (पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक, हवालदारालाही मारहाण) चालक ढाब्यावर गेल्याची संधी साधून इकडे चोरट्यांनी कंटेनरचे कुलूप तोडले. आतामध्ये पाहिले असता चहा पत्तीचे पुडे आढळून आले. चोरट्यांनी चहा पत्तीचे 142 बॉक्स चोरून पसार झाले. या 142 चहापत्तीच्या बॉक्सची किंमत ही तब्बल 9 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चालक जेव्हा कंटेनरकडे परत आला तर त्याला कंटेनर उघडलेले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. या कंटेनरमध्ये महागडी चहाची पत्ती होती, हे आधीच चोरट्यांना माहिती असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फ्लिपकार्टचे डिलिव्हरी बॉयच निघाले चोर दरम्यान, फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग कंपनीकडून ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना मिळत नसल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून येत होती. तसंच ऑर्डर रद्द केलेल्या वस्तू गोडाऊनमध्येही सापडत नव्हत्या. यानंतर कंपनीने शोध घेतला असता त्यांनाही धक्का बसला, कारण या वस्तूंवर डिलिव्हरी बॉयच डल्ला मारत होते. (घरात घुसले, मारहाण केली आणि 5 लाखांची मागितली खंडणी, अखेर….) ऑर्डर केलेल्या या वस्तू चोरणाऱ्या तीन डिलिव्हरी बॉयना एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. प्रणय ढवळ, सागर राजगोरे, भूषण गांगण अशी त्या अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात