जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक, हवालदारालाही मारहाण

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक, हवालदारालाही मारहाण

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक, हवालदारालाही मारहाण

जुने कैदी आणि नवीन कैद्यांमध्ये एकमेकांसमोर आले.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 9 नोव्हेंबर : राज्यातून दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण - जुने कैदी आणि नवीन कैद्यांमध्ये एकमेकांसमोर आले. आणि या दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली आहे. इतकेच नव्हे तर दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा प्रयत्न कारागृह पोलीस हवालदाराने केला. तर त्या हवालदारालाही कैद्यांच्या जमावाने मारहाण केली. ही धक्कादायक घटना येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट 7 जवळ असलेल्या बरेक नंबर 27 ते 31 या बॅरिकजवळ घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा -  पुण्यात विचित्र अपघात, नवीन कात्रज बायपासजवळ 9 वाहनांची एकमेकांना धडक, 15 जखमी आरोपींची नावे पुढीलप्रमाणे - समीर शकील शेख तरंग राकेश परदेशी निलेश श्रीकांत गायकवाड पुरुषोत्तम राजेंद्र वीर देवा नानासो जाधव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात