रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 09 नोव्हेंबर : ‘अपहरण करून पाच लाख रूपये द्या अन्यथा तुमच्या मुलाला ठार करू’ अशी धमकी देत वडिलांकडून पाच लाख रूपयांची खंडणी घेण्यात आली. याची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिसात करताच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीना नागपूर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर तालुक्यातील ग्राम भानेगाव इथं राहणारे गौरव संतोष बेदरे यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ आणि त्याचे चार मित्र सेल्सटॅक्स कॉलनी इथं भाड्याच्या खोलीत राहतात. ( शेकडो तरुणांना माओवादी बनवलं, पहिल्या स्थानिक तरुणाचा अखेर मृत्यू ) तर काही आरोपींनी त्यांचा रूममध्ये येऊन त्यांना मारहाण केली. व त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या वडिलांना कडून 5 लाख रूपये द्या नाहीतर तुमच्या मुलास ठार करू अशी फोनवरून धमकी दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बेदरे कुटुंबीय हादरून गेलं. त्यांनी कसे बसे पैसे गोळा करून आरोपींना दिले. (जेलमधून पॅरोलवर सुटला, रस्त्यात गाठला; तरुणाचे शीर केले धडावेगळे, चंद्रपूर हादरलं) आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर गौरव बेदरे यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भादंविच्या कलम 364 (अ), 386, 452, 342, 327, 323 अन्वये गुन्हा नोंद केला. स्थानिक शाखेने आपले चक्र फिरवीत आरोपींना नागपूर येथून अटक केली आहे. सर्व पाच ही आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी हे छोटा गोंदिया येथील असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.