जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : 'या' हॉटेलमध्ये मिळते दिवाळी स्पेशल भाजणीची चकली, तब्बल 111 वर्षांची आहे परंपरा, Video

Nashik : 'या' हॉटेलमध्ये मिळते दिवाळी स्पेशल भाजणीची चकली, तब्बल 111 वर्षांची आहे परंपरा, Video

Nashik : 'या' हॉटेलमध्ये मिळते दिवाळी स्पेशल भाजणीची चकली, तब्बल 111 वर्षांची आहे परंपरा, Video

Nashik: शहरातील प्रसिद्ध भगवंतराव हॉटेलची भाजनीची चकली प्रसिद्ध आहे. या हॉटेलने तब्बल 111 वर्षांची परंपरा जपलेली आहे.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक 17 ऑक्टोंबर : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. दिवाळीचा फराळातील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे चकली. चकली खायला सर्वांनाच आवडते. चकली आवडतं नाही असा क्वचितच कोणी सापडेल. दिवाळी काही दिवसांवर आली असल्यामुळे चकली खरेदी करण्यासाठी नाशिक शहरातील प्रसिद्ध भगवंतराव हॉटेल इथे खवय्यांची गर्दी होत आहे. नाशिक शहरातील प्रसिद्ध भगवंतराव हॉटेलची भाजनीची चकली प्रसिद्ध आहे. या हॉटेलने तब्बल 111 वर्षांची परंपरा जपलेली आहे. बारा महिने नाशिक शहरातूनच नव्हे तर जिल्हाभरातून खवय्ये या चकलीची टेस्ट घेण्यासाठी येतात आणि पार्सल देखील घेऊन जातात. मात्र, दिवाळीमध्ये या चकलीला प्रचंड मागणी असते. 400 रुपये किलोने या चकलीची विक्री केली जाते. दिवाळी काही दिवसांवर आली असल्यामुळे चकली खरेदी करण्यासाठी आता खवय्यांची गर्दी पाहिला मिळत आहे. हेही वाचा :  Diwali 2022 : दिवाळीत घर सजावटीचा प्लॅन करताय? ‘हा’ प्रकार ट्राय करा, सर्वजण होतील इम्प्रेस, Video या डाळींची बनवली जाते चकली भाजणीच्या चकलीमध्ये हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, तांदूळ यांचं मिश्रण करून भाजणी करतात आणि त्यानंतर ती चकली बनवून उत्तम प्रतीच्या तेलात तळली जाते. त्यामुळे ही भाजणीची चकली ग्राहकांना आवडते, असं हॉटेल मालक सुहास अष्टपुत्रे सांगतात. क्वालिटीमुळे इतक्या वर्षांची परंपरा टिकून  एखाद्या हॉटेलने 100 हून अधिक वर्षांची परंपरा टिकून ठेवणे म्हणजे खूप महत्वाची बाब आहे. कारण हल्ली स्पर्धा वाढली आहे. हाताच्या अंतरावर विविध हॉटेल आहेत. मात्र, इतके वर्षे भगवंतराव हॉटेलने आपल स्थान टिकवून ठेवलं आहे. भाजनीची चकली हा त्यांचा फेमस पदार्थ आहेच. मात्र, इतर ही अनेक पदार्थ त्यांचे दर्जेदार आहेत. ते क्वालिटीमध्ये अजिबात काटकसर करत नाही. उत्तम प्रतीचे साहित्य वापरतात. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचा कल इकडे जास्त असतो आणि दिवाळी म्हटल की त्यांची भाजणीची चकली फेमसच असते, अशी प्रतिक्रिया खवय्ये सुयश माळी यांनी दिली आहे. हेही वाचा :  Diwali 2022 : मुंबईतील चिवडा बाजारात काय आहे मस्त? पाहा VIDEO

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे आहे भगवंतराव हॉटेल  नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार कारंजा लगत मेनरोडला हे हॉटेल आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: diwali , food , nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात