जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चालत्या वाहनातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचे अश्लील इशारे, महिला शिवसैनिकांनी महामार्गावर चोपले, LIVE VIDEO

चालत्या वाहनातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचे अश्लील इशारे, महिला शिवसैनिकांनी महामार्गावर चोपले, LIVE VIDEO

चालत्या वाहनातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचे अश्लील इशारे, महिला शिवसैनिकांनी महामार्गावर चोपले, LIVE VIDEO

नाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा झाला आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 05 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाचा आज दसरा मेळावा होणार आहे. एकीकडे शिंदे गटाकडून बसेस, खासगी वाहनांमधून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहे. यातच आतच नाशिक-मुंबई महामार्गावरुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलं? नाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा झाला आहे. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी चोप दिला. तर चालत्या वाहनातून अश्लील इशारे केले, असा आरोप महिला शिवसैनिकांनी केला आहे. यामुळे अश्लील इशारे केल्याचा कारणावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून रस्त्यातच चोप दिला. ही घटना नाशिक मुंबई महामार्गावरील शहापूर जवळ घडली.

जाहिरात

आज दसरा मेळावा - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर दाखल झाले आहे. दरम्यान, आज  सकाळी औरंगाबादहून अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे एकाच विमानाने मुंबईकडे रवाना झाले. विमानात दोघांच्या सीट आजूबाजूला होत्या. त्यामुळे दोघेही हास्य विनोद करीत असतानाची क्लिप व्हायरल झाली आहे. ‘सामना कुणाला वाचायची गरज आहे? यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संवाद रंगला होता. सामना तुम्हाला आणि आम्हाला वाचण्याची आवश्यकता आहे असा विनोद संदीपान भुमरे यांनी केला. त्यावर अंबादास दानवेही दिलखुलास हसताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात