मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Children Day : 5 ॲप्स आणि 3 वेबसाईट बनवणारी नाशिकची अँड्रॉईड गर्ल, पाहा Video

Children Day : 5 ॲप्स आणि 3 वेबसाईट बनवणारी नाशिकची अँड्रॉईड गर्ल, पाहा Video

Children's Day : आदीश्री पगार या चिमुरडीने डिजिटल विश्वात वाखन्याजोग काम केलं आहे. तिने एक दोन नव्हे तर तब्बल 5 अँड्रॉइड ॲप आणि 3 वेबसाईटची निर्मिती केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक 14 नोव्हेंबर : वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी नाशिकच्या आदीश्री पगार या चिमुरडीने डिजिटल विश्वात वाखन्याजोग काम केलं आहे. तिने एक दोन नव्हे तर तब्बल  5 अँड्रॉइड ॲप आणि 3 वेबसाईटची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे तिने बनविलेले ॲप आणि वेबसाईट या समाज प्रबोधन करणारे आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. तसेच नुकतच तिने बनविलेल्या ट्रॅफिक ॲपची सद्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. कारण तिचं हे ॲप वाहन धारकांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहे. चला तर आज 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिनानिम्मित ॲप आणि वेबसाईट बनवणाऱ्या आदीश्री पगार बद्दल जाणून घेऊया.

आदीश्री पगार ही मूळची बागलाण तालुक्यातील उत्राने येथील रहिवासी असलेली सद्या सटाण्यात वास्तव्यास आहे. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ती इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. वडील अविनाश पगार हे सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे लहानपणापासूनच तिला डिजिटलची आवड निर्माण झाली आहे. तसेच ती हुशार असून तिला देखील नव नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. विशेष म्हणजे समाज प्रबोधन तसेच पर्यावरण पूरक गोष्टी करणाऱ्यास जास्त आवडतात आणि त्याकडे तिचा कल जास्त असतो, असं वडील अविनाश पगार सांगतात.

Children's Day : मुलीसाठी धडपडणाऱ्या बाबाची 'गोष्ट', लेकीला करून दिली नव्या जगाची ओळख! Video

या ॲपची केली निर्मिती

1) पाणी वाचविण्यासाठी 'वॉटर सेंन्सेशन' या ॲपची निर्मिती केली आहे.

2) तसेच झाडांचे महत्व पटवून देणारे 'ऑक्सिजन' ॲप तयार केले आहे.

3) तसेच विद्यार्थ्यांसाठी 'स्कूल चले हम' हे ॲप बनविले आहे.

4) तसेच विविध देशांच्या ध्वजांची माहिती देणारे 'फ्लॅगज् ऑफ कंट्रीज' हे ॲप तयार केले आहे.

5) आणि नुकतच वाहन धारकांसाठी ट्रॅफिक ॲप तयार केले आहे.

हे सर्व ॲप तयार करताना सामाजिक प्रबोधन हाच दृष्टीकोन असल्याची प्रतिक्रिया आदीश्री पगारने दिली आहे.

Childrens Day Speech: बालदिनानिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

या वेबसाईट ठरल्या दिशादर्शक

मुळात आदीश्रीला लहानपणापासूनच सामाजिक कामांची आवड आहे. विशेष म्हणजे तिच्यावर 'तुफान आलया' या अमेरखान यांच्या या मोहिमेचा तिच्यावर अधिक भर पडला आणि तेव्हापासून आपण देखील काही तरी सहभाग निसर्ग वाचविण्यासाठी नोंदवूया असा तिने ठाम निश्चय केला. तिने पहिली वेबसाईट ही पाणी फाऊंडेशनचे काम सांगणारी 'सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ' ही तयार केली तसेच ऑरियर्स ऑफ हेल्थ ही वेबसाईट तयार केली आहे.

तिच्या 'माझ्या स्वप्नातील गाव' ही गावाचा प्रचार प्रसार करणारी वेबसाईट आहे. ज्या माध्यमातून गावाच महत्व काय आहे आपण आपल्या गावाशी बांधिलकी कशी जपली पाहिजे याच महत्व पटवून देणारी आहे. इंग्रजी मराठी भाषेतून गावात हव्या असणाऱ्या गोष्टींची माहिती अत्यंत सुलभतेने दिली आहे. शासकीय योजनांचे महत्त्व तसेच साक्षरता, जल व्यवस्थापन,आरोग्य केंद्र,झाडांचे महत्व अशा अनेक गोष्टी या वेबसाईट मध्ये अधोरेखित केल्या आहेत. त्यामुळे आता आदीश्रीची अँड्रॉइड गर्ल म्हणून सर्वदूर ओळख निर्माण होऊ पाहत आहे.

प्रोग्रॅमींग कोडींगचे पुस्तक प्रकाशित

आदीश्रीची इतक्या लहान वयातील गुणवत्ता बघून अनेक जन तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहे. ॲप,वेबसाईटसह तिने प्रोग्रॅमींग कोडींगचे स्वतःचे पुस्तक देखील तयार केले आहे. वेबसाईटसाठी लागणाऱ्या प्रोग्रॅमींग भाषेच्या 'लर्न बूटस्ट्रप वेब डिझाईन' या पुस्तकाचे लेखन तिने केले आहे. इतरांना वाचवण्यासाठी हे पुस्तक मिळावं म्हणून तिने आपल्या वेबसाईटवर देखील अपलोड केले आहे.

Childrens Day Special : बालदिनाचा आनंद करा द्विगुणित, चिमुकल्यांसह सर्वांना द्या अशा गोड शुभेच्छा

क्यूआर कोड च्या माध्यमातून झाडांची जनजागृती

आदीश्रीने नाशिक शहरातील जवळपास दीडशे विविध जातीच्या झाडांची माहिती सांगणारे क्यूआर कोड तयार केले आहेत. म्हणजे ते झाडांवरती लावल्यानंतर, तुम्ही तो क्यूआर कोड स्कॅन केला की तुम्हाला त्या झाडाविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होईल. त्या झाडाचं नाव काय आहे. मुळ जात कोणती, त्याचा उपयोग,गुणधर्म अशी सविस्तर माहिती मिळेल.

First published:

Tags: Children Day, Local18, Nashik