मुंबई, 12 नोव्हेबर: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी कित्येक लोकांनी आपलं आयुष्य वेचलं. कित्येक लोकांनी बलिदान दिलं. समाजसुधारणा, क्रांतिकार्य, राजकारण इत्यादी सर्व माध्यमातून अनेक लोक आपापल्या क्षमतेनं देशासाठी झटत होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत पंडित जवाहरलाल नेहरुंनी मोठं योगदान दिलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. पंडित नेहरूंनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पंडित नेहरुंना लहान मुलं फार आवडायची. म्हणूनच 14 नोव्हेंबर ही पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती, दरवर्षी बालदिन किंवा चिल्ड्रन्स डे म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनानिमित्त दरवर्षी देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. देशातील सर्व शाळांमध्ये बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातो. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं तुम्हालाही एका गोष्टीची तयारी करावी लागणार आहे. तुमच्या घरातील लहान मुलाला भाषण लिहून देण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. दरवर्षी बालदिनानिमित्त शालेय मुलांना भाषण करण्यास सांगितलं जातं. मग तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारी करून घ्यावी लागते. तुम्ही त्यांची भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (childrens day speech for children) करून घेताना पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. हेही वाचा: वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्रमैत्रिंणींना द्या खास शुभेच्छा, Whatsappला ठेवा हे सुंदर स्टेटस बालदिनानिमित्त भाषणात पुढील मुद्द्यांचा समावेश करा-
- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबरला बालदिनाच्या रूपात साजरा करतात.
- ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होते.
- पंडित नेहरूंना लहान मुलं खूप आवडायची.
- लहान मुलं त्यांना प्रेमानं ‘चाचा नेहरू’ म्हणायची.
- पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त देशभरातील प्रत्येक शाळेत बालदिन साजरा केला जातो.
- या दिवशी लहान मुले शाळेत गीत, नृत्य, नाटक इत्यादी कार्यक्रम सादर करतात.
- शाळेत कार्यक्रमानंतर मिठाई वाटली जाते.
- नेहरूंनी आधुनिक भारताच्या उभारणीचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले.
- या दिवशी देश नेहरूंची आठवण काढतो.
- पंडित नेहरूंनी देशासाठी केलेलं कार्य भारतीयांच्या कायम स्मरणात राहील.