नाशिक 28 ऑगस्ट : धावत्या गाड्यांनी रस्त्यावर किंवा पेट्रोल भरत असतानाच अचानक पेट घेतल्याचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षातही पाहायला मिळतात. अशावेळी प्रसंगावधान राखत वेळीच या गाडीपासून दूर जाणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. अशीच एक थरारक घटना नाशिकच्या येवल्यात पाहायला मिळाली. BREAKING : परळी औष्णिक विद्युत केंद्राजवळ 103 जिलेटीनच्या कांड्या जप्त, स्फोटाचा डाव उधळला या घटनेत येवल्याच्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. द बर्निंग बुलेटचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गाडीने पेट घेताच पंप कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
येवल्यात पेट्रोल पंपावर अचानक बुलेटने घेतला पेट, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/YJrLqdEtxB
— News18Lokmat (@News18lokmat) August 28, 2022
पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या बुलेट मोटरसायकलने पेट घेतल्याची घटना येवल्यातील पेट्रोल पंपावर घडली. पेट्रोल भरल्यानंतर बुलेट सुरू करताना गाडीने पेट घेतला. यावेळी गाडीवर दोन लोक बसलेले होते. मात्र गाडी पेट घेत असल्याचं जाणवताच त्यांनी गाडी उभा केली आणि खाली उतरत ते गाडीपासून दूर गेले. यानंतर काहीच वेळात गाडी आगीच्या गोळ्यात बदलली. अजब गोटमार परंपरा; एकमेकांवर दगडफेक करण्याच्या विचित्र खेळादरम्यान 300 जण जखमी अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने आगीवर नियंत्रण मिळविलं. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. परंतु, बुलेट या आगीत पूर्णपणे जळाली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.