जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : परळी औष्णिक विद्युत केंद्राजवळ 103 जिलेटीनच्या कांड्या जप्त, स्फोटाचा डाव उधळला

BREAKING : परळी औष्णिक विद्युत केंद्राजवळ 103 जिलेटीनच्या कांड्या जप्त, स्फोटाचा डाव उधळला


अतिसंवेदनाशील असलेल्या परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात राख माफियांकडून राखेचा उपसा केला जातो

अतिसंवेदनाशील असलेल्या परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात राख माफियांकडून राखेचा उपसा केला जातो

अतिसंवेदनाशील असलेल्या परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात राख माफियांकडून राखेचा उपसा केला जातो

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 28 ऑगस्ट : परळी औष्णिक विद्युत केंद्राजवळ (Parli thermal power station ) जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी पकडले आहे. या तिघांकडून 103 जिलेटीनच्या कांड्या 150 तोटे बॅटरी यासह स्फोटासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. अतिसंवेदनाशील असलेल्या परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात राख माफियांकडून राखेचा उपसा केला जातो आणि याच राखेची चोरी करण्यासाठी वीज निर्मिती केंद्राजवळ स्फोट करण्यासाठी आलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या तिघांकडून 103 जिलेटीनच्या कांड्या 150 तोटे बॅटरी यासह स्फोटासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. (बनावट सोनं देऊन तब्बल 16 लाखांना गंडवलं, बीडमधील घटना) यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्राला धोका निर्माण झाला आहे. राख उपसा करणाऱ्या राख माफियांकडून औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळच स्फोट करून राख उपसली जात होती. शुक्रवारी सायंकाळी असाच स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले होते. आता पोलिसांनी या तिघांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात