नाशिक, 28 जानेवारी : नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप कुणाला पाठिंबा देणार याबाबत पक्षाने अद्यापही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. मात्र अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा भुमिपुत्राच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने अहमदनगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, पाठिंब्याबाबत पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही मात्र आम्ही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. हे स्पष्ट आहे. आम्ही भूमिपुत्र म्हणजेच जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला पाठिंबा का द्यावा? अशी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीसांना सांगणार आहोत. पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल असे सूचक वक्तव्य करत सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचे सुतोवाच केलंय.
सी-वोटरच्या सर्व्हे बाबत बोलताना विखे म्हणाले की, 'ज्यांनी सर्व्हे केलाय मला त्यांची व्यक्तिगत भेट घ्यायची. मागील लोकसभेला शिवसेनेच्या जागा मोदींना बघून निवडून आल्यात. लोकांनी मोदींचा फोटो बघून शिवसेनेला मतदान केले त्यात ठाकरे गटाचे व्यक्तीगत कौशल्य नाही. हिच वास्तविकता असून पक्ष संपलाय, आमदार निघून गेलेय मात्र सर्व्हेच्या आधारावर आनंद साजरा केला जातोय. सर्व्हे चांगला म्हणून आनंद साजरा करण्याची ठाकरे गटावर परिस्थिती आल्याचा टोला विखे यांनी लागवला.
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप जिंकणार आहे. जी परीस्थिती आज दाखवली जातेय त्याच्या उलट परिस्थिती आघाडीची होणार असल्याचे देखील खा. सुजय विखे म्हणाले.
(कल्याण डोंबिवली वाचवली तरी.., संजय राऊतांनी शिंदेंच्या मुलाबद्दल थेट बोलले)
'सत्ता गेल्यामुळे अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. अगोदर संजय राऊत यांच्यावर झाला होता आणि आता संगतीमुळे अनेकांवर परिणाम होतोय. हळूहळू अशा अनेकांचे संतुलन बिघडत जाणार आहे. असे संतुलन बिघडलेल्या रोगींनी मला भेटावे. न्युरोसर्जन असल्याने मी योग्य उपचार करू शकतो, अशी खोचक टीका सुजय विखे पाटील यांनी संजय राऊतांसह नाना पटोले यांच्यावर केलीये. नाना पटोले यांनी लोकसभेच्या ३८ जागा आघाडी जिंकणार असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा सुजय विखे पाटलांनी समाचार घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.