मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कल्याण डोंबिवली वाचवली तरी.., संजय राऊतांनी शिंदेंच्या मुलाबद्दल थेट बोलले

कल्याण डोंबिवली वाचवली तरी.., संजय राऊतांनी शिंदेंच्या मुलाबद्दल थेट बोलले

  दोन हिंदुह्रदयसम्राट या देशात होऊन गेले. स्वातंत्र्य वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तुम्ही का केला नाही,

दोन हिंदुह्रदयसम्राट या देशात होऊन गेले. स्वातंत्र्य वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तुम्ही का केला नाही,

दोन हिंदुह्रदयसम्राट या देशात होऊन गेले. स्वातंत्र्य वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तुम्ही का केला नाही,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 जानेवारी : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात महाविकास आघाडीला 4 जागा मिळाल्या तरी खूप आहे. मी त्यांना म्हणेन त्यांनी कल्याण डोंबिवली वाचवली तरी खूप आहे' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत याांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

पद्म पुरस्कारावरून संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सी व्होटर्सच्या सर्व्हेवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केला.

जेव्हा त्यांच्या सोईचे सर्व असतात त्यांना ते हवे असतात. राष्ट्रीय पातळीवरचा सर्वे भाजपच्या बाजूचा आहे तो त्यांना हवा आहे. राज्य पातळीवरचा त्यांच्या विरोधात आहे तो त्यांना नकोय. त्या सर्वेक्षणानुसार, 34 जागा महाविकास आघाडीला मिळतील. आम्हाला वाटते ४० जागा आम्हाला मिळतील. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, महाविकास आघाडीला 4 जागा मिळाल्या तरी खूप आहे. मी त्यांना म्हणेन त्यांनी कल्याण डोंबिवली वाचवली तरी खूप आहे, असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावला.

मुलायमसिंग यांना मरणोत्तर पद्मविभूषण दिला जातोय यावर आमचा आक्षेप नाही. मुलायमसिंग यांनी बाबरी मशिद प्रकरणात घेतलेली भूमिका, कारसेवकांवर केलेला गोळीबार यावर आमचा आक्षेप आहे. बाकी ते मोठे समाजवादी नेते होते. मुख्य म्हणजे भाजप आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी मुलायमसिंग यांचा हत्यारा असा उल्लेख केला होता. त्यांना हिंदुंचे हत्यारे म्हणत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करणारे आपण आज मुलायम सिंग यांना पद्मविभूषण देत आहात. आपल्या विचारात जो बदल होत आहे तो मी निदर्शनास आणला, मग दोन हिंदुह्रदयसम्राट या देशात होऊन गेले. स्वातंत्र्य वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तुम्ही का केला नाही, असा सवाल राऊतांनी भाजपला केला.

'बाळासाहेब ठाकरेंनी तर त्याचवेळी कठोर भूमिका घेतली म्हणून वातावरण तापले, पेटले आणि पुढे गेले. भाजपने त्यावेळेस माघार घेतली की हे आमचे काम नाही. तेंव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ते शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे. मुळात राजकीय अभिनिवेश सोडून यांना पदवी कधी देणार. बाळासाहेबांना पदवी द्या असे आम्ही कधीच मागणी करणार नाही. पण मग तुम्ही विचार कधी करणार आहात? मुलायमसिंग यांच्या कुटुंबीयांनी मागणी केली नव्हती, असंही राऊत म्हणाले.

' बाळासाहेबांचे तैलचित्र लावून कुणी आम्ही विचारांचा वारसदार अशा पिपाण्या वाजवून चालणार नाही. राष्ट्रीय पातळीवर बाळासाहेबांचा सन्मान करतंय का? हे पहावे लागेल, असा टोलाही राऊतांनी शिंदे गटाला लगावला.

पवार साहेब म्हणत आहेत हे बरोबर आहे. त्यांची वंचित बरोबर चर्चा नाही. सध्या चर्चा फक्त आमच्यात आणि वंचितमध्ये आहे, असंही राऊत म्हणाले.

First published:
top videos