मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Social Midea Amruta Fadanvis : चुकीला माफी नाही! अमृता फडणवीस यांच्याविरोधात पोस्ट करणारा भाजप कार्यकर्ता तडीपार

Social Midea Amruta Fadanvis : चुकीला माफी नाही! अमृता फडणवीस यांच्याविरोधात पोस्ट करणारा भाजप कार्यकर्ता तडीपार

अमृता फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला चंद्रपूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

अमृता फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला चंद्रपूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

अमृता फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला चंद्रपूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chandrapur, India

चंद्रपूर, 28 जानेवारी : सोशल मीडियावर आक्षेपार्ह बोलल्या प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला चंद्रपूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. खेमदेव गरपल्लीवार असं तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गरपल्लीवार हे गोंडपिंपरी नगरपंचायतीच्या अपक्ष नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांचे पती आहेत. यांच्या वर गोंडपिंपरी पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ, धमकावणे, जमीन बळकावने, विनयभंग या सारखे आहेत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 

विशेष म्हणजे त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. जुलै 2022 मध्ये अमृता फडणवीस यांनी वेश्याव्यवसायाबाबत केलेल्या वक्तव्यावर गरपल्लीवार यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. याप्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट या संबंधीत गुन्हा देखील दाखल झाला होता.

हे ही वाचा : 'पहाटेच्या शपथविधी'चा भाजपकडून खुलासा कधी होणार? चंद्रकांत पाटील अखेर स्पष्ट बोलले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता फडणवीस यांच्या फोटोवर सामाजिक माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य गोंडपिपरी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या खेमदेव ऊर्फ खेमचंद किसनराव गरपल्लीवार (वय 49) रा. तुकडोजीनगर, गोंडपिपरी ता. गोंडपिपरी याने केले होते. त्याबाबत पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पहाटेच्या थपथविधीमागे कोणाचा हात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं वक्तव्य केलं होतं. 

हे ही वाचा : 'कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्याला पद्मविभूषण आणि सावरकर-बाळासाहेबांचा विसर' सेनेचा मोदी सरकारला सवाल

याबाबत शरद पवार  यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली, आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच  बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र दिसत असल्याचं म्हणत  त्यांनी निवडणूक सर्व्हेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Amruta fadanvis, BJP, Chandrapur, Devendra Fadnavis, Social media, चंद्रपूर chandrapur