नाशिक 24 नोव्हेंबर : लग्न करताना प्रत्येक जण प्रेमाच्या आणाभाका घेतात. एकमेकांना आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देण्याचं वचन देतात. पण, लग्नानंतर थोडे मतभेद झाले की काडीमोड करण्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढत आहेत. अगदी काही दुर्दैवी प्रसंगात तर पती-पत्नी एकमेंकांच्या जीवावर देखील उठलेल्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण, नाशिकचे साबळे दाम्पत्य अशा प्रकारच्या घटनांना सणसणीत अपवाद आहे. नाशिकच्या अनिता साबळे यांनी पतीचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता, स्वतःची किडनी पती हनुमंत साबळे यांना दिलाी. अनिता यांनी हे धाडस दाखवत हनुमंत यांना अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय. अनितामुळेच हनुमंत यांना पुनर्जन्म मिळाला आहे. पत्नीमुळेच हनुमंत सुखरूप हनुमंत साबळे हे नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरात राहतात. त्यांनी अतिशय गरिबीत आपले दिवस काढले आहेत. छोटी मोठी कामं करून त्यांनी कुटुंबाला हातभार लावला. आता त्यांनी स्वत:चा चायनीजचा गाडा सुरू केला आहे. त्या गाड्यावर ते बिर्याणीसह अनेक पदार्थ विकतात. त्यांचा हा व्यवसाय स्थिर होत असतानाच कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला. चिंता मिटली, मरायला मोकळा झालो! पाहा असे का म्हणाले दिव्यांग आजोबा? Video कोरोनाच्या काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना दुकान बंद करावं लागलं. त्यांचं आर्थिक नियोजन ढासाळलं. आर्थिक संकटात असतानाच त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर किडनी निकामी झाल्याचं निदान केलं आणि संपूर्ण कुटंबाला धक्का बसला. खडतर परिस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड सुरू असतानाच इतकं मोठं संकट आल्यानं साबळे कुटुंब हादरलं. त्यांच्या नातेवाईकांना हात वर केले. पण, पत्नी अनिता आणि मुलं मदतीला धावून आले. अनिता यांनी फक्त त्यांना धीर दिला नाही तर नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून त्यांना किडनी डोनेट केली. हनुमंत यांचा जीव वाचला आणि ते मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर पडले. पत्नीच्या प्रेमामुळेच मी आज जिवंत आहे, अशी भावना हनुमंत साबळे यांनी व्यक्त केली. माझं कुटुंब माझं सर्वस्व! हा खडतर प्रवास सांगताना अनिता यांना अश्रू अनावर झाले. ‘अशा वेळी कुणीही मदतीला येत नाही. माझ्या नवऱ्याला किडनीची गरज होती. तर सर्वच दूर झाले. मी किडनी घेण्याचा निर्णय केला त्यावेळी माझ्या माहेरच्यांसह सासरच्या मंडळींनी देखील त्याला विरोध केला. पण, मी माघार घेतली नाही. उकळते वडे हातानं काढणाऱ्या महिलेचा व्हिडीओ पाहिलाय? सत्य समजल्यावर कराल सलाम! मला माझा संसार महत्त्वाचा होता. माझे पती, मुलं सुखी समाधानी राहिले तरच मला सर्व काही मिळालं असं मी समजते. संकटं कुणावरही येऊ शकतात. त्यावेळी मदत केली पाहिजे. किडनी ट्रान्सफर होऊन काही दिवस उलटले आहेत. आमच्या दोघांचीही तब्येत छान आहे. आम्हाला हाच आनंद आहे,’ अशी भावुक प्रतिक्रिया अनिता यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.