मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : कॉलेजातल्या आदिवासी मुलानं बांबूपासून बनवल्या आकर्षक वस्तू, पाहा Video

Nashik : कॉलेजातल्या आदिवासी मुलानं बांबूपासून बनवल्या आकर्षक वस्तू, पाहा Video

आदिवासी भागातील मुलं प्रचंड क्रिएटिव्ह आहेत. या भागातील मुलांना संधी मिळाली तर ते काय करू शकतात हे चेतननं दाखवलं आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक 23 नोव्हेंबर : आदिवासी भागातील मुलं प्रचंड क्रिएटिव्ह आहेत. या भागातील मुलांना संधी मिळाली तर त्यांनी देशपातळीवर स्वत:चं नाव गाजवलं आहे. त्यांना अनेक कला त्यांना उपजत असतात. फक्त त्यात आणखी प्रोफेशनल मार्गदर्शनाची गरज असते.ते मिळालं की त्यांचं खरं कौशल्य समोर येतं

चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा येथील चेतन वेलादी या आदिवासी मुलानं बांबूपासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू सर्वांचं आकर्षण ठरत आहेत. त्याने स्वत:चं शिक्षण सांभाळत हा व्यवसाय सुरू केला आहे.

शिक्षण सांभाळत सुरुवात

चेतन वाणिज्य शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची आहे.आई वडील मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यामुळे आर्थिक अडचणींना कायम तोंड द्यावं लागतं, त्यात शिक्षणासाठी कुठून पैसे आणायचे हा चेतन समोर प्रश्न होता. घरच्या बिकट परिस्थीमधून मार्ग काढण्यासाठी आपण शिक्षणासोबतच काही तरी व्यवसाय करूयात, म्हणजे कुटुंबाला थोडा आधार मिळेल, याच अनुषंगाने चेतनने आपल्याच भागातील बांबूपासून विविध वस्तू तयार करायचं ठरवलं, त्यासाठी त्यानं प्रशिक्षण देखील घेतलं, आणि व्यवसाय सुरू केला.

कोणतंही प्रशिक्षण न घेता साकारल्या अविश्वसनीय कलाकृती, पाहताक्षणी पडेल भुरळ, Video

हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला अनेक अडचणी आल्या, मात्र हळूहळू त्याचा व्यवसायात जम बसला. तो चांगल्या वस्तू बनवू लागला. कटिंगसाठी लागणारे मशीन ही त्याने आदिवासी विभागाच्या मदतीने घेतले. आता तो अनेक वस्तू आकर्षक पद्धतीनं बनवत आहे. या वस्तूंना चांगली मागणी असल्याचं चेतननं सांगितलं

कोणत्या वस्तूंचं आकर्षण?

चेतन तुमच्या ऑर्डर प्रमाणे वस्तू तयार करून देतो,पण त्याने बनवलेल्या राष्ट्रध्वज,गणपतीची मूर्ती,बैलगाडी,रोलर,विविध देव देवतांचे मुखवटे,तबला,घड्याळ,पाळणा,अशा विविध भेटवस्तू ग्राहकांना आकर्षक ठरत आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेत मिळतात 'वारली' चित्रकलेचे धडे, कलाकृती पाहून तुम्हीही व्हाल थक्क, Video

आम्हाला जमलं नाही ते मुलानं केलं

'आमचे दिवस  खूप गरिबीत गेले आहेत. काबाड कष्ट करून आम्ही मुल मोठी केली त्यांनी काही तरी करावं हे आम्हाला वाटतं,आम्ही शिकलो नाही पण त्यांनी तरी शिक्षण घ्यावं असं आम्हाला वाटतं. या शिक्षणासाठी लागणारे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होता.  मुलाची शिकायची इच्छा होती. मी स्वत: पैसे कमवतो आणि त्यातून शिकतो, असं तो म्हणाला. त्यानंतर त्यानं हा व्यवसाय सुरू केला याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्याने खूपच चांगल्या वस्तू बनवल्या आहेत. नेहमीच वेगळं काही तरी करण्याची त्याची धडपड असते. तो खूप हुशार आहे, आणखी खूप काही करेल अशी प्रतिक्रिया चेतनचे वडील रवींद्र वेलादी यांनी दिली आहे.

मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

'आदिवासी समाजातल्या मुलांकडं अनेक कलागुण आहेत. त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्यानं ते काहीच करू शकत नाहीत. सरकारनं त्यांना मदत करणे आवश्यक आहे. या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं तर ते नक्कीच स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनतील,' अशी भावना चेतन वलादीनं व्यक्त केली.

कागदी लगद्यातून क्रांती करणारा कलाकार, Video पाहून बसणार नाही डोळ्यांना विश्वास!

इथं करा संपर्क,घरपोच मिळतील वस्तू

चेतन वेलादी,मुक्काम लोहारा,ता जि.चंद्रपूर

अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 7823813577

First published:

Tags: Local18, Nashik