मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : कोणतंही प्रशिक्षण न घेता साकारल्या अविश्वसनीय कलाकृती, पाहताक्षणी पडेल भुरळ, Video

Nagpur : कोणतंही प्रशिक्षण न घेता साकारल्या अविश्वसनीय कलाकृती, पाहताक्षणी पडेल भुरळ, Video

लडिवाळ हातांनी अत्यंत सुबक, रेखीव आणि हुबेहूब अशा ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती तयार करणारा कलाकार नागपुरात आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Nagpur, India

 नागपूर, 23 नोव्हेंबर : लाकडापासून बनवलेली खेळणी, कलाकृती आपण अनेक ठिकाणी पाहिल्या असतील. लाकडावर कोरीन काम करून उत्कृष्ट कलाकारी चांगली जोमात असताना लाकुडतोड बंद झाल्याने त्यावर बंधन आली. मात्र, यावर पर्यायी मार्ग म्हणून संगमरवरी दगड, आणि कागदाच्या लगद्यापासून अनोख्या कलाकृती साकारल्या जात आहेत. नागपुरात  देखील एक असाच कलाकार असून कागदाच्या लगद्यापासून तो सुबक अशा कलाकृती साकारतो. 

धारधार सर्जरी ब्लेडच्या साह्याने मानवी शरीरावर मोठ्यात मोठी शस्त्रक्रिया केली जाते. मात्र, या सर्जरी ब्लेडचा वापर फोम बोर्ड, माउंट बोर्ड, हार्ड बोर्ड, इत्यादींवर करून लडिवाळ हातांनी अत्यंत सुबक, रेखीव आणि हुबेहूब अशा ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती निर्माण केली आहे नागपुरातील अभिजात कलावंत अरुण गुल्हाने यांनी. विज्ञान तसेच कायद्याचे आणि बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या अरुण गुल्हाने यांनी कला क्षेत्रात कुठलेही प्रशिक्षण न घेता हा छंद मागील 40 वर्षांपासून जोपासला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या ऐतिहासिक वास्तू त्यांनी प्रत्यक्षात देखील बघितल्या नसून त्यांची कलात्मक आणि सरावाच्या जोरावर केलेली कला निर्मिती बघणाऱ्यांना भुरळ पाडून प्रत्यक्षात ती वास्तू डोळ्यापुढे उभी राहिल्याचा साक्षात्कार होतो.

सरावातून कलाकृतीमध्ये परिपक्वता

मला ऐतिहासिक वास्तू बद्दल आकर्षण होतं. मासिक, वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणारे विविध वास्तूंचे कात्रण जमवून त्यासारखीच हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यातूनच अनेक गोष्टी शिकून सरावातून या कलाकृतीमध्ये परिपक्वता प्राप्त झाली. ही कला करताना शल्यचिकित्सकाच्या चाकूची व कौशल्य पारंगतेची आवश्यकता असते. तसेच एकाग्रता, चिकाटी व मेहनत याची नितांत गरज असते. कलाकार आपल्या कलेप्रती निष्ठावान असावा लागतो. मगच त्याने आकृतीबद्ध केलेली कलाकृती अजरामर ठरते. तीच त्याची तपस्या असते, असे अरुण गुल्हाने म्हणतात.

 अशी बनवली जाते कलाकृती

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर मी संपूर्ण वेळ कलेला समर्पित केला. कुठलेही कलाकृती तयार करण्यापूर्वी त्या कलाकृतीचा आलेख कागदावर काढावा लागतो. दरवाजे, खिडक्या, कुंपणाची भिंत, भिंतीवरील कलाकुसर वेगवेगळी साकारावी लागते. नंतर आयव्हरी शीटवर तेच डिझाईन काढण्यात येते. सर्जरीच्या धारदार ब्लेडने त्याचे कटींग करण्यात येते. त्यानंतर फेव्हीकॉलच्या मदतीने हे तुकडे जोडून कलाकृतीचा एकएक भाग तयार करण्यात येतो. अशा प्रकारे एक पूर्ण कलाकृती साकारण्याला साधारणतः सहा महिने ते वर्षाचा कालावधी लागतो. तयार होणारी प्रत्येक कलाकृती संगमरवरी दगडांनी तयार केलेली मूळ वास्तू सारखीच वाटते, अशी माहिती अरुण गुल्हाने यांनी दिली.

फक्त अर्ध्या तासांमध्ये 'ती' काढते पिंपळाच्या पानावर अप्रतिम चित्रं, पाहा Video

राम मंदिराचे कार्य सुरू

विविध आकारांचे फोम बोर्ड, आयव्हरी पेपर, हार्ड बोर्ड, फेव्हिकॉल इत्यादी पासून आत्तापर्यंत नागपुरातील सक्करदरा येथील लक्ष्मीनारायण मंदिर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर, कस्तुरचंद पार्कवरील ऐतिहासिक वास्तू, राजस्थानातील अल्वार येथील महाराजा बख्तावरसिंगची छत्री, जोधपूर येथील राजा जसवंतसिंगची समाधी, आग्रा येथील ताज महाल अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंची निर्मिती केली आहे. आत्ता अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कार्य सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. आजतागायत केलेल्या कलाकृतींची अनेक ठिकाणी प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. अनेकांनी या कार्याची प्रशंसा केली आहे. या कलेतून आत्मिक समाधान लाभत असून ही कला माझ्या आयुष्यातील एका साधने प्रमाणे मी जपली आहे. इथून पुढे देखील या कलेची सेवा करत राहील, अशी भावना अरुण गुल्हाने यांनी व्यक्त केली.

First published:

Tags: Local18, Nagpur