मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : विद्यार्थ्यांना शाळेत मिळतात 'वारली' चित्रकलेचे धडे, कलाकृती पाहून तुम्हीही व्हाल थक्क, Video

Nashik : विद्यार्थ्यांना शाळेत मिळतात 'वारली' चित्रकलेचे धडे, कलाकृती पाहून तुम्हीही व्हाल थक्क, Video

नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव आश्रम शाळा प्रशासनाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे वारली चित्रकलेचे धडे दिले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी उत्कृष्ट वारली चित्रकृती साकारत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 19 नोव्हेंबर : वारली चित्रकृती म्हटलं की आदिवासी समाज डोळ्यासमोर येतो. कारण त्या समाजात या कलेला विशेष प्राधान्य असते. तसेच त्यांचा तो उपजत गुण ही असतो. त्यांच्या रक्तात ती कला भिनलेली असते. मात्र, त्या कलेला अजून थोड अधिक चांगल मार्गदर्शन दिलं तर ती कला विशेष उंचीवर जाऊन त्यातून त्यांचा व्यवसाय तयार होऊ शकतो. हाच विचार करत नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव आश्रम शाळा प्रशासनाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे वारली चित्रकलेचे धडे दिले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी उत्कृष्ट वारली चित्रकृती साकारत आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक संचलित मुंढेगाव निवासी आश्रम शाळा ही इगतपुरी तालुक्यात आहे. या शाळेत जवळपास 362 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी कला शिक्षकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातील विशेष उपक्रम म्हणजे वारली चित्रकृती साकारणे हा आहे. मुळात आदिवासी विद्यार्थ्यांच्या रक्तातच ही कला भिनलेली असते. त्यांना अगदी सहज ही कला अवगत होते आणि त्यांच्यामधील त्या कलेच कौशल्य बघता. शाळेचे मुख्याध्यापक तन्वीर जहागीरदार यांनी ही कला फक्त विद्यार्थ्यांकडे किंवा शाळेपूर्ती मर्यादित न ठेवता सर्वांसमोर आली पाहिजे ठरवले.

Mumbai : पक्ष्यांच्या पंखावर चित्र काढणारा एकमेव भारतीय कलाकार, पाहा Video

त्यामुळे त्यांनी कला शिक्षक संजय दुर्गावाड यांना त्या संदर्भात सूचना केल्या आणि या कलेकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलं आणि कला शिक्षकांनी ही प्रत्येक विद्यार्थ्यांमधील गुण हेरून मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थी सुंदर प्रकारे वारली चित्रकृती साकारू लागले. आता शाळेतील जवळपास चौथी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट विविध वारली चित्रकृती अवघ्या काही मिनिटात साकारतात. यामध्ये आमच्या कलागुणांना वाव देऊन शिक्षकांनी आम्हाला यात विशेष घडवलं अशी प्रतिक्रिया विद्यार्थी दुर्गेश बागुल याने दिली आहे.

 व्यावहारिक दृष्ट्या फायदा व्हावा यासाठी आमचा विशेष प्रयत्न

मुळात आदिवासी भागात ही कला चांगली जोपासली जाते. त्यामुळे त्यांना या विषयी चांगली माहिती असते. मात्र, ते या कलेचा वापर हा व्यावहारिक,व्यवसायिक दृष्ट्या करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना या केलेचा मोबदला मिळत नाही. परंतु आमचा या उपक्रमा मागचा हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात या कलेचा फायदा झाला पाहिजे.

त्यांना याबाबत व्यवसाय कसा करायचा याच ज्ञान मिळालं पाहिजे. वारली चित्रकृतींची विक्री कशी केली पाहिजे. याच ज्ञान आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत आणि विद्यार्थी देखील ते चांगल्या प्रकारे आत्मसात करत आहेत. आतपर्यंत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक वारली चित्रकृती साकारल्या आहेत आणि त्यांची विक्री देखील केली आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशात आम्ही अजून त्यासाठी लागणार साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांना अधिक काम करण्यास प्रोत्साहन देत आहोत,असं शाळेचे मुख्याध्यापक तन्वीर जहागीरदार यांनी सांगितले.

Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

कला शिक्षकांच्या भरतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव 

विद्यार्थ्यांमध्ये ती कला आहे. फक्त आम्ही योग्य मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थी या कलेत यशस्वी झाले आहेत. कारण कोणत्याही गोष्टीचे योग्य मार्गदर्शन मिळाले तर माणूस अधिक चांगल काम करू शकतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही असच झालं आहे. त्यांनी साकारलेली वारली चित्रकृती बघून आम्हाला खूप आनंद होतोय आणि विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना ही आनंद होतोय. की आमची मुलं इतकी छान काम करतात. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी घडण्यास नक्कीच मदत होईल,असं कला शिक्षक संजय दुर्गावाड यांनी सांगितले.

वारली चित्रकृती म्हणजे काय ? ती कशी साकारतात

वारली चित्रकृती ही महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे. डहाणू तसेच पालघर परिसरात राहणाऱ्या वारली जनजातींची ही चित्रे जगप्रसिद्ध झालेली आहेत. लोकसंस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कला प्रकाराकडे पाहिले जाते. गेरूणे सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पांढऱ्या पीठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते. वारली समाजातील महिला शेतीचा हंगाम सण उत्सव अशा प्रसंगी भिंतीवर वारली चित्रे काढतात. त्रिकोण, गोल आणि आयत या भौमितिक आकृतींचा प्रामुख्याने वापर या चित्रकलेत केलेला पाहायला मिळतो.

कागदी लगद्यातून क्रांती करणारा कलाकार, Video पाहून बसणार नाही डोळ्यांना विश्वास!

इथे संपर्क करा

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली चित्रकृती तुम्हाला पाहिजे असतीलतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक संचलित मुंढेगाव आश्रम शाळा,तालुका इगतपुरी,जिल्हा नाशिक या ठिकाणी मिळतील.

फोन नं : 9422730450

First published:

Tags: Local18, Nashik