मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कागदी लगद्यातून क्रांती करणारा कलाकार, Video पाहून बसणार नाही डोळ्यांना विश्वास!

कागदी लगद्यातून क्रांती करणारा कलाकार, Video पाहून बसणार नाही डोळ्यांना विश्वास!

कागदाच्या लगद्यापासून पेपरमेशी कलाकार सुभाष कडू यांनी विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 17 नोव्हेंबर : आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळावा. त्यांनी बनवलेल्या कौशल्यपूर्ण विविध कलाकृती समाजा समोर याव्यात म्हणून नाशिकमध्ये राज्यस्तरीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये पेपरमेशी कलाकार सुभाष कडू यांनी कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या विविध शोभेच्या वस्तूंचा स्टॉल लावला आहे आणि तो स्टॉल  नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यांची ही अनोखी कला सर्वांनाचा मोहून टाकणारी आहे.

पेपरमेशी कलाकार म्हणून ओळख असलेले सुभाष धर्मा कडू हे मूळचे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील रामखिंड गावचे रहिवासी आहेत. त्यांचे आजोबा आणि वडील हे पेपरमेशी कलाकार होते. कागदाच्या लगद्यापासून शोभेच्या विविध वस्तू बनवून त्या विक्री करत असत. त्यांचंच बघून सुभाष यांना ही कला अवगत झाली. ही कला पूर्णपणे आत्मसात करून नवा व्यवसाय त्यांनी उभारला आहे. सुभाष हे अतिशय छान आणि उत्कृष्ठ वस्तू बनवतात. त्यांना अनेक ठिकाणाहून मागणी असते आणि शोभेच्या वस्तू आकर्षक असल्यामुळे किंमत ही चांगली मिळते. त्यावरच त्यांचा संपूर्ण घराचा उदरनिर्वाह चालत असल्याची माहिती पेपरमेशी कलाकार सुभाष कडू यांनी दिली आहे.

Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

कशा बनवल्या जातात या शोभेच्या वस्तू ?

या वस्तू बनवण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. यामध्ये लाल माती घेऊन ती मळली जाते. मळून ती एकजीव केली जाते. त्यानंतर तिला आकार दिला जातो. आकार दिल्यानंतर कागदाचा बारीक लगदा करून त्यावर थापला जातो आणि मग या दोन वस्तूंना एकत्रित घट्ट करण्यासाठी जंगलातील धामण नावाच्या झाडाची साल काढून ती बारीक कुटली जाते. त्यानंतर साधारण आठ दिवस ती पाण्यात भिजवली जाते.

मग ती हळूहळू सडते, सडल्यानंतर त्यातून फेविकॉल सारखा गोंद निघतो आणि तो त्या कागदाच्या लगद्यात मिक्स करून त्यावर लावला जातो. हे झाल्यानंतर चार पाच दिवस ती वस्तू सुकवली जाते आणि त्यानंतर पुन्हा रेती मधील जे गुळगुळीत दगड असतात. त्यांनी वरून त्या वस्तूची फिनिशिंग केली जाते.अशा कठोर मेहनती मधून या शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात.

Nashik : आदिवासी पदार्थ, गाणी आणि बऱ्याच काही गोष्टींचा घ्या एकत्र अनुभव, पाहा Video

या आहेत शोभेच्या वस्तू 

प्राणी तसेच विविध देवतांचे मुखवटे,बैलगाडी, रोलर, पारंपरिक वाद्य तारपा, विविध कंदील, कासव,घड्याळ, मडके,धनुष्यबाण या वस्तू आहेत. त्यांची किंमत साधारण वस्तूच्या आकारावर ठरत असते. मात्र काही दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागते. तेव्हा वस्तू बनवून मिळतात.

कुठे मिळतात या अनोख्या शोभेच्या वस्तू

सुभाष धर्मा कडू ,राहणार रामखिंड,तालुका जव्हार,जिल्हा पालघर,अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. 9930942590,9326020025

नागरिकांचा चांगला प्रतिसाद

मुळात अशा वस्तू सर्वांनाच आवडतात. कारण पर्यावरण पूरक वस्तू असतात. आकर्षक असल्यामुळे घराची शोभा ही वाढत असते. सुभाष कडू यांनी राज्यभरातील अनेक प्रदर्शनामध्ये हजेरी लावली आहे. त्यांच्या वस्तूंना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.अनेक जण त्या वस्तू खरेदी करत आहेत.

First published:

Tags: Local18, Nashik, Palghar