मुंबई, 22 जुलै : काल राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मू यांची निवड झाली. त्यांच्या विरोधात यशवंत सिन्हा निवडणूक लढवत होते सिन्हा यांना या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत व्हाव लागलं. द्रौपदी मुर्मू यांनी 6 लाख 76 हजार 803 इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला. मुर्मू यांचा विजय झाल्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचे अभिनंदन करण्यात आले. (CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सरकारी कार्यालयाकडून पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मुर्मू यांचा फोटोच नसल्याने अनेकांनी आश्चर्य भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये भला मोठा फोटो हा एकनाथ शिंदे यांचाच दिसत आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी या पोस्टवर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : 'शिवसेना खासदारांच्या नाराजीला विनायक राऊतच जबाबदार'; राहुल शेवाळेंनी सांगितलं कारण
राष्ट्रपती कोण आहे हाच सर्वांना प्रश्न पडला आहे. ज्या राष्ट्रपती झाल्या आहेत त्यांचा तरी फोटो लावायला हवा होता असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तर काहींनी ही अभिनंदनाची पोस्ट पाहून राष्ट्रपती कोण झालंय हेच कळत नसल्याचा टोला लगावला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत पेजवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यामध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन, ‘श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे मुख्यमंत्री, असा आशय लिहत मुर्मू यांच्या विजयानंतर या पेजवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. मात्र या फोटोमध्ये केवळ एकनाथ शिंदेंच दिसत आहेत. यामुळे नेटकऱ्यांनी या पेजवर कमेंट्या स्वरुपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
द्रौपदी मुर्मूना महाराष्ट्रातून मते किती?
महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना 181 तर यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली. राज्याच्या 283 आमदारांनी मुर्मू यांना मत दिलं, यातली 279 मतं अधिकृत धरण्यात आली. रमेश लटके यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या 287 एवढी आहे. यातले नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत. तर भाजपचे लक्ष्मण जगताप आजारपणामुळे मतदानाला येऊ शकले नाहीत. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी हे कोर्टात दोषी आढळल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Maharashtra News, President