मुंबई 16 सप्टेंबर : नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, की ‘आदित्यला काय कळतं. तो जी काय मागणी करत होता कंपनीकडे ती आता काहीच दिवसात बाहेर येईल. तुमचा काळ संपला. भविष्यात मंत्री मुख्यमंत्री यासारखी संधी तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ट्विट करत राहा, पण ते कोणी वाचणार नाही’, असा शब्दांत नारायण राणे यांनी टोला लगावला. आता राष्ट्रीय पातळीवरही एकनाथ शिंदेंचीच ‘हवा’, 12 राज्यांच्या प्रमुखांचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावर बोलताना नारायण राणे यांनी ‘कोण ओळखतं त्याला’? असा सवाल केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. यावरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर आता पवारांना धक्का; नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार याबाबत जे काही ठरेल, ते आम्ही लवकरच सांगू. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही याबद्दल बोलत आहेत. पंतप्रधानांसोबत यासाठी अद्याप नवीन भेट ठरली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. उद्धव ठाकरेंना घर सोडत नाही. त्यांना आता काय काम आहे? घर बसल्या मीडियाला ब्रेकिंग न्यूज देत आहेत. स्वतः काही करू शकले नाहीत, त्यांच्या पापामुळे कंपनी महाराष्ट्रातून गेली, असा आरोपही राणा यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.