सिंधुदुर्ग, 12 जून : राज्यसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीत सहा जागांवर एकूण सात उमेदवार रिंगणात होते. यापैकी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन उमेदवार आणि तीन जागांवर भाजपचे उमेदवार जिंकले. तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. महाविकास आघाडीला अपक्ष आणि लहान पक्षांचा पाठिंबा असतानाही शिवसेनेचा (Shiv Sena) उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरुन आता नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणे म्हणाले, मला सांगायचं आहे उद्धव ठाकरेजी (CM Uddhav Thackeray) सत्तेसाठी 145 मते लागतात.. तुम्ही अल्पमतात आला आहोत. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजुला व्हा. या महाराष्ट्राला 10 वर्षे मागे नेलंत. सत्तारुढ आणि विरोधक यांचं लोकशाहीत असलेलं नातंही तुम्ही धुळीला मिळवलं. त्यामुळे सत्तेवर राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही. वाचा : “… तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील” : संजय राऊत तुमचे आमदार… आठ-आठ, नऊ-नऊ आमदार फुटतात. याचा अर्थ विश्वासार्हता आहे कुठे? स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत आणि बढाया मारतात असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे पुढे म्हणाले, शरद पवारांनी निवडणुकीनंतर जी प्रतिक्रिया दिली त्यातून काहीतरी बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणा… माणुसकीचा धर्म आहे. शरद पवारांनी त्याप्रमाणे म्हटलं, पराभवाचा आम्हाला कुठलाही धक्का नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच काम केलं, माणसं जपली, आमदार सांभाळली असं कौतुक केलं. राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली. अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्याने हा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. या पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे आणि आता शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.