सिंधुदुर्ग, दिनेश केळुसकर, 25 मे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा मुलगा माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभे होते. पण, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. पराभव जिव्हारी लागलेल्या नारायण राणे यांनी यापुढे निवडणूक लढवावी की नाही? याचा विचार करावा लागेल असं विधान केलं होतं. निकालाच्या दोन दिवसानंतर नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.
राणे दिल्लीला रवाना का झाले?
नारायण राणे हे भाजपच्या कोट्यातील राज्यसभा खासदार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत भाजपच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये 4 वाजता ही बैठक होणार आहे. नारायण राणेंना देखील या बैठकीचं निमंत्रण आहे. त्यामुळे नारायण राणे हे या बैठकीकरता दिल्लीला रवाना झाले आहेत.
शिवसेनेच्या या खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात मिळू शकते संधी
काय आहेत पराभवाची कारणं?
शिवसेनेचं एकहाती वर्चस्व असलेल्या रत्नागिरीत जिल्ह्यात नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचं जाळ नाही. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर पक्ष वाढीसाठी राणेंन प्रयत्न केलं. पण, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मात्र नारायण राणेंना आपला जम बसवता आला नाही.
सिंधुदुर्गातही राणेंनी विश्वास गमावला
एकीकडे कोकणात 2014प्रमाणे यावेळी ॲन्टी राणे लाट नसताना आणि दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा असहकार असतानाही विनायक राऊत यांना 2014च्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळालंय. विशेष म्हणजे राणेंचे दुसरे पुत्र नितेश राणे आमदार असलेल्या कणकवली विधानसभा मतदार संघात निलेश राणेंना जेमतेम दहा हजारांच्या मताधिक्यांवर रोखण्यात शिवसेनेला यश आलंय.त्यामुळे राणेंचा निकालाबबतचा हेराफेरीचा आरोप राऊत यांनी धुडकावून लावला आहे.
नरेंद्र मोदींचा ‘जबरा फॅन’; छातीवर चाकूनं लिहिलं ‘मोदी’
निलेश राणेंची बेताल,अर्वाच्य टीका
माजी खासदार निलश राणे यांची बेताल आणि अर्वाच्य टीका हे देखील पराभवामागील एक प्रमुख कारण आहे.
राणेंच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर नवख्या असलेल्या पक्षात पदाधिकाऱ्यांची नाराजी देखील दिसून आली. शिवाय, निवडणुकीच्या तोंडावर काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत देखील प्रवेश केला.
SPECIAL REPORT : मृत्युच्या दारातून लहानग्यांना खेचून आणणाऱ्या 'हिरो'ने सांगितली थरारक कहाणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.