नरेंद्र मोदींचा ‘जबरा फॅन’; छातीवर चाकूनं लिहिलं ‘मोदी’

नरेंद्र मोदींच्या फॅननं आपल्या छातीवर 'मोदी' असं चाकून लिहिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 01:58 PM IST

नरेंद्र मोदींचा ‘जबरा फॅन’; छातीवर चाकूनं लिहिलं ‘मोदी’

लखनऊ, 25 मे : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये, नरेंद्र मोदींच्या चाहत्यांना देखील आनंदाचं उधाण आलं. नरेंद्र मोदींच्या विजयानंतर बिहारमधील एका फॅननं तर चक्क आपल्या छातीवर मोदी असं लिहिलं. मोदींच्या या जबरा फॅनला पाहायाला आता मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील होत आहे. सोनू पटेल असं नरेंद्र मोदींच्या फॅनचं नाव आहे. सोनू मोतिहारीमधील तूरकौलिया या भागात राहायाला आहे.

23 मे रोजी निकाल येऊ लागताच सोनू पटेलनं उपस्थित लोकांना मिठाई खाऊ घातली. त्यानंतर चाकू घेत त्यांनं आपल्या छातीवर मोदी असं लिहिलं. ‘नरेंद्र मोदी भारताचं भविष्य़ असल्याचं सोनू पटेलचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासाठा देव आहेत. जर ते देशासाठी बलिदान देऊ शकतात. तर मी देखील त्यांच्यासाठी बलिदान द्यायला तयार आहे’ असं सोनूनं म्हटलं आहे.


शिवसेनेच्या या खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात मिळू शकते संधी

बिहारमध्ये भाजपला यश

Loading...

बिहारमध्ये लोकसभेकरता भाजपनं जदयूसोबत हातमिळवणी केली. लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी जदयू 17, भाजप 17 आणि रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टीनं 6 जागा लढवल्या होत्या.त्याचा निकाल देखील चांगला लागला. कारण, भाजप आणि मित्रपक्षाला 38 जागा जिंकता आल्या. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 22, लोकजशक्ती पार्टीला 6 आणि भाजपविरोधात लढणाऱ्या जदयूला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.

भाजपचं मोठं यश

2014पेक्षा देखील मोठी कामगिरी भाजपनं 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केली आहे. 2014ची तुलना करता भाजपला 8 जागा जास्त मिळाल्या आहेत. तर एनडीएला 350 जागा मिळाल्या आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मिळवलेला सलग दुसरा विजय आहे. 30 मे रोजी नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रदानपदाची शपथ घेतील. राज्यात देखील शिवसेना – भाजप युतीनं मोठं यश मिळवलं आहे.


VIDEO: धक्कादायक! पवना नदीत हजारो मृत माशांचा खच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...