सिंधुदुर्ग, 18 ऑक्टोबर : उद्धव ठाकरेंकडे कोकणच्या विकासाबाबत सांगण्यासारखे काही नाही. म्हणून ते फक्त टीका करत आहे. पण आपण त्यांच्या टीकेची दखल घेत नाही, असा हल्लाबोल भाजपचे नेते नारायण राणेंनी केला. मी वांद्रे इथं जाऊनच शिवसेनेवर टीका करेन असंही नारायण राणे म्हणाले. तसंच ईडीच्या चौकशीसाठी एकट्यानंच जायचं असतं, लवाजमा घेऊन जायचं नसतं, असा टोलाही राणेंनी प्रफुल्ल पटेलांना लगावला.