Home /News /maharashtra /

लैंगिक समस्येवर उपचारासाठी गेला अन् भलतीच समस्या घेऊन आला; जळगावातील तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

लैंगिक समस्येवर उपचारासाठी गेला अन् भलतीच समस्या घेऊन आला; जळगावातील तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

Crime in Jalgaon: जळगावातील एका 40 वर्षीय रुग्णासोबत विचित्र प्रकार घडला आहे. लैंगिक समस्येवर जडीबुटीचा उपचार घेणं संबंधित रुग्णाला चांगलंच महागात पडलं आहे.

    जळगाव, 20 डिसेंबर: जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका 40 वर्षीय रुग्णासोबत विचित्र प्रकार घडला आहे. लैंगिक समस्येवर जडीबुटीचा उपचार घेणं संबंधित रुग्णाला चांगलंच महागात पडलं आहे. जडीबुटीचा उपचार करण्याच्या नावाखाली रुग्णाचे विवस्त्र फोटो काढून (Clicked obscene photos) त्याला ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनं संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन (Threat to viral photos) फिर्यादीकडून लाखो रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested) केली असून पुढील तपास केला जात आहे. वैदू सुरजसिंग चितोडिया असं अटक केलेल्या 19 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव असून तो भुसावळ येथील रहिवासी आहे. आरोपी वैदू सुरजसिंग हा रस्त्यावर तंबू टाकून जडीबुटीच्या माध्यमातून लोकांचा उपचार करतो. आरोपी वैदू याने गावातील 40 वर्षीय स्थानिक रुग्णाला हेरून त्याचा विश्वास संपादन केला. लैंगिक समस्या सोडवण्यासाठी तंबूत उपचार करावे लागतील, असं त्याने फिर्यादीला समजावलं. हेही वाचा-हायप्रोफाइल सोसायटीच्या 7 व्या मजल्यावरुन विवस्त्र खाली पडली तरुणी, तपास सुरु फिर्यादीने वैदूवर विश्वास ठेवून तंबूत उपचारासाठी गेला. याठिकाणी सूरज याने फिर्यादीला जडीबुटीचा उपचार करायचं असल्याचं सांगून विवस्त्र व्हायला भाग पाडलं. विवस्त्र झाल्यानंतर आरोपीनं गुपचूप फिर्यादीचे अश्लील फोटो काढले. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, फिर्यादीकडून सुमारे तीन लाख रुपये उकळले आहेत. तसेच जडीबुटीचा उपचार केल्याचं बिल म्हणून आरोपीनं फिर्यादीकडून 1 लाख 68 हजार रुपये देखील घेतले आहेत. हेही वाचा-जालना: कॉलेजच्या पटांगणात तरुणाला दिला भयंकर मृत्यू; तीक्ष्ण हत्याराने घातले घाव गेल्या बऱ्याच दिवसांपासून ब्लॅकमेलिंगचा हा प्रकार सुरू होता. पण अखेर एका पत्रकाराला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला आहे. पत्रकाराने पीडित तरुणाला मदतीचा हात देत त्याची ब्लॅकमेलिंगच्या समस्येतून बाहेर काढलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सूरजला लातूर जिल्ह्यातील औसा येथून ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास जळगाव पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon

    पुढील बातम्या