Home /News /crime /

धक्कादायक! दिराने डॉक्टर वहिनीवर गोळ्या झाडत स्वतःही केली आत्महत्या; कारण जाणून हादराल

धक्कादायक! दिराने डॉक्टर वहिनीवर गोळ्या झाडत स्वतःही केली आत्महत्या; कारण जाणून हादराल

Man Killed Sister in Law : विजयने आपल्या वहिनीला जेवण गरम करण्यास सांगितलं. मात्र तिने नकार दिला. यानंतर BHMS डॉक्टर असलेली वहिनी आपल्या क्लिनिकमध्ये निघून गेली.

    भोपाळ 20 डिसेंबर : क्षुल्लक कारणावरुन दिराने आपल्या वहिनीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली (Man Killed Sister in Law and Commit Suicide). ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh News) देवास जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर पाठवला पॉर्न व्हिडिओ, सांगितलं विचित्र कारण घटना देवासच्या गोपालपुरा येथील आहे. यात संदीप नावाच्या व्यक्तीचा भाऊ विजय याचं आपल्या वहिनीसोबत जेवण गरम करण्यावरुन भांडण झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयने आपल्या वहिनीला जेवण गरम करण्यास सांगितलं. मात्र तिने नकार दिला. यानंतर BHMS डॉक्टर असलेली वहिनी आपल्या क्लिनिकमध्ये निघून गेली. मिळालेल्या माहितीनुसार काही वेळातच तिचा दीर क्लिनिकमध्ये पोहोचला आणि त्याने वहिनी रीनावर गोळी झाडली. यानंतर त्याने आपला भाऊ संदीपला फोन करून रीनाला गोळी मारल्याचं सांगितलं. यानंतर फोन कट करून त्याने स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केली. विवाहितेवर शेजाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार, भलत्याच कारणावरुन करायचे ब्लॅकमेल आसपासचे लोक जेव्हा क्लिनिकमध्ये पोहोचले तेव्हा रीना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण घरगुती वादाचं जाणवत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी विजयच्या मृतदेहाजवळून घटनेत वापरण्यात आलेली गाडी आणि बंदुक दोन्ही जप्त केलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Murder news, Suicide news

    पुढील बातम्या