मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sanjay Biyani murder: बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा दोन महिन्यांच्या तपासानंतर उलगडा, हत्येच्या षडयंत्राबाबत धक्कादायक माहिती उघड

Sanjay Biyani murder: बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा दोन महिन्यांच्या तपासानंतर उलगडा, हत्येच्या षडयंत्राबाबत धक्कादायक माहिती उघड

बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा, हत्येच्या षडयंत्राबाबत धक्कादायक माहिती उघड

बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा, हत्येच्या षडयंत्राबाबत धक्कादायक माहिती उघड

Nanded famous builder sanjay biyani murder case solved: नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे.

नांदेड, 1 जून : नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या हत्याकांडात आठ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आज पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Nanded famous builder Sanjay Biyani murder case solved)

दोन महिन्यांच्या तपासानंतर हत्येचा छडा

गेल्या पाच एप्रिल रोजी संजय बियाणी यांची दोन मारेकऱ्यानी गोळ्या झाडून हत्या केली होती . तब्बल दोन महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी या हत्येच्या छडा लावला आहे. खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणी यांच्या हत्येमागे कुख्यात गुंड रिंधाचा संबध असण्याची शक्यता आहे.

गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद

नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. बाहेरून ते साडे अकरा वाजता घरी आले, तेव्हा आरोपींनी अगदी त्यांच्या कार जवळ येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वाचा : तो बेशुद्ध पडला होता अन् मित्र लाकडी दांड्याने मारत होता, नवी मुंबईतला VIDEO

बांधकाम व्यवसायात संजय बियाणी हे नाव नांदेडमध्ये प्रसिद्ध आहे. नायगाव तालुक्यातील कोलंबी गावचे ते रहिवाशी होते. 10 वर्षापूर्वी संजय बियाणी नांदेडला स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांनी स्थानिक केबल नेटवर्कमध्ये जाहिरात एजन्सी चालवली. नंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच ते मोठे व्यावसायिक झाले. जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी त्याचे चांगले संबंध होते. आठ दिवसांपूर्वीच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संजय बियाणी यांच्या एका प्रोजेक्टच उद्घाटन केल होतं.

तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रिंधा याच्या गुंडांनी खंडणीसाठी धमकी दिली होती. नांदेडमधील अनेक व्यापारी आणि उद्योजकांना अशा धमक्या तेव्हा आल्या होत्या. पोलिसांनी संजय बियाणी यांना सुरक्षा दिली होती. नंतरच्या काळात रिंधा गंगची दहशत संपली. मागच्या डिसेंबरमध्ये पोलीस विभागाने संजय बियाणी यांचा सुरक्षा रक्षक काढून घेतला.

First published:

Tags: Crime, Nanded