मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तो बेशुद्ध पडला होता अन् मित्र लाकडी दांड्याने मारत होता, अंगावर शहारे आणणारा VIDEO

तो बेशुद्ध पडला होता अन् मित्र लाकडी दांड्याने मारत होता, अंगावर शहारे आणणारा VIDEO

घटनास्थळावर शंकरचे रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेले आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावर शंकरचे रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेले आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावर शंकरचे रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेले आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • Published by:  sachin Salve

प्रमोद पाटील, प्रतिनिधी

नवी मुंबई, 30 मे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका मित्राने आपल्याच मित्राला () काठीने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील (navi mumbai) एपीएमसी भाजी मार्केटमध्ये (apmc market) घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये ई-८९७ क्रमांकाच्या गळ्याबाहेर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शंकर पानसरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आणि ही व्यक्ती एपीएमसी भाजी मार्केटमध्ये हमाल म्हणून काम करायची.

मिळालेल्या माहितीवरून असे समजले की, दोन मित्रांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर रवी नावाच्या व्यक्तीने त्याच्या शंकर पानसरे नावाच्या मित्राचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून केला, ही घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच ठिकाणी आरोपी रवी आणि मयत शंकर हे दोघे काम करत होते. दोघांमध्ये काही अंतर्गत प्रकरणामुळे वाद होते. याचाच परिणाम म्हणून लाकडी दांडक्याने रवी याने शंकर याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. ज्यामुळे तो बेशुद्ध पडला  पण तो जीव सोडेपर्यंत रवी हा शंकरला दंडक्याने मारतच होता.

घटनास्थळावर शंकरचे रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेले आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published: