नांदेड, 05 एप्रिल: नांदेड (Nanded) शहरात भरदिवसा संजय बियाणी (Sanjay Biyani) नावाच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची (well-known builder) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे. या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) आता समोर आलं आहे.
नांदेड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांची हत्या करण्यात आली. संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. बाहेरून ते साडे अकरा वाजता घरी आले, तेव्हा आरोपींनी अगदी त्यांच्या कार जवळ येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला.
संजय राऊतांच्या नेमक्या किती आणि कोणत्या मालमत्तेवर ईडीची टाच?
बांधकाम व्यवसायात संजय बियाणी हे नाव नांदेडमध्ये प्रसिद्ध आहे. नायगाव तालुक्यातील कोलंबी गावचे ते रहिवाशी होते. 10 वर्षापूर्वी संजय बियाणी नांदेडला स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांनी स्थानिक केबल नेटवर्कमध्ये जाहिरात एजन्सी चालवली. नंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच ते मोठे व्यावसायिक झाले. जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी त्याचे चांगले संबंध होते. आठ दिवसांपूर्वीच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संजय बियाणी यांच्या एका प्रोजेक्टच उद्घाटन केल होतं.
तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रिंदा याच्या गुंडांनी खंडणीसाठी धमकी दिली होती. नांदेडमधील अनेक व्यापारी आणि उद्योजकांना अशा धमक्या तेव्हा आल्या होत्या. पोलिसांनी संजय बियाणी यांना सुरक्षा दिली होती. नंतरच्या काळात रिंदा गंगची दहशत संपली. मागच्या डिसेंबरमध्ये पोलीस विभागाने संजय बियाणी यांचा सुरक्षा रक्षक काढून घेतला. दरम्यान आजची घटना खंडणीतून झाली की व्यावसायिक स्पर्धेतून याचा तपास सुरू आहे.
पोलीस अधिक्षकांची प्रतिक्रिया
संजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितलं. आज सकाळी अकराच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी त्याच्या गाडीचा पाठलाग केला. घराजवळ गाडी येताच दुचाकी समोर लावून त्यांनी संजय बियाणी यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या. घरातून बाहेर आलेल्या एका कामगारावर पण आरोपींनी गोळी झाडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी ( Sanjay Biyani Nanded ) यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार pic.twitter.com/XgiS7aDAul
दरम्यान 2019 साली संजय बियाणी यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. कुख्यात दहशतवादी हरविंदसिंघ रिंदा याच्या नावाने त्यांना खंडनी मागण्यात आली होती. तेव्हा त्यांना सुरक्षाकर्मी देण्यात आला होता. डिसेंबरमध्ये पोलीस दलाने त्याचा सुरक्षा रक्षक काढला. दरम्यान सध्या त्यांनी धमकी किंवा अन्य कुठलीही तक्रार केली नव्हती असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे. त्यांची हत्या नक्की कोणत्या कारणामुळे झाली हे अजून स्पष्ट नाही. सर्व बाजूने तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक म्हणालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.