Home /News /maharashtra /

Congress Nana Patole : बंडखोरांसोबतची महाशक्ती कोण हे राज्यपालांच्या भूमिकेनंतर दिसून आली : नाना पटोले

Congress Nana Patole : बंडखोरांसोबतची महाशक्ती कोण हे राज्यपालांच्या भूमिकेनंतर दिसून आली : नाना पटोले

राज्यात जो काही हुकूमशाही प्रकार सुरू आहे त्याला राज्याच्या राजकीय परंपरेला गालबोट लागल्याचे दिसून येईल. असे माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (congress nana patole) म्हणाले.

  मुंबई, 03 जून : देशाच्या जनतेला राज्यात (Maharashtra state government) काय सुरू आहे याबाबत माहिती आहे. पुढच्या काही काळात टेक्निकल बाबी पूर्ण होऊन अध्यक्ष कोणाचा होईल हे स्पष्ट होईल. महाशक्ती कोण आहे हे आम्हाला राज्यपालांच्या (Maharashtra state governor) भुमीकेनंतर समजले आहे. राज्यात जो काही हुकूमशाही प्रकार सुरू आहे त्याला राज्याच्या राजकीय परंपरेला गालबोट लागल्याचे दिसून येईल. असे माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (congress nana patole) यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

  ते पुढे म्हणाले कि, भाजपचे नेते वेळ बघून नेहमी बदलत असतात त्यांच्याविषयी काही बोलायचे त्यांनी तर लोकशाहीच्या विरोधात जाऊन काम केले आहे. राज्यपाल मागच्या काही दिवसांत जे काही वागले त्यातून बंडखोर आमदारांची महाशक्ती कोण आहे हे सगळ्या देशाला समजले आहे. शिवसेनेने पक्ष कार्यालय बंद केल्याचा प्रश्न विचारताच नाना पटोले यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले. पुढच्या काही वेळात विधानसभेचा अध्यक्ष कोण होईल हे महाराष्ट्राला समजेल असे पटोले म्हणाले.

  हे ही वाचा : शिवसेनेची मोठी खेळी, शिंदे गट विधानभवनात पोहोचण्याआधीच कार्यालयाचे 'दार' केले बंद!

  मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांसाठी पोलिसांची यंत्रणा : संजय राऊत

  राज्याची जनता सरकारला मान्य करणार नाही, आम्ही जनतेसाठी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वात झोकून काम करणार आहे पुन्हा शिवसेनेला (shiv sena) उभारी देण्याचे काम करणार आहे. देशात भाजपने (bjp) 9 सरकार पाडले परंतु आमची देशातील सगळे विरोध पक्षांची नेहमी चर्चा असते यामुळे देशात भाजपला रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी दिली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गैरवापर काल झाल्याचे दिसून आल्याचेही ते म्हणाले. (sanjay raut criticize bjp over shiv sena rebel mlas)

  हे ही वाचा : Assembly Speaker Election : शिंदे सरकारचा आज पहिला 'पेपर', फडणवीसांच्या रणनीतीने सरकार होणार 'पास'?

  दरम्यान काल राज्यात मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी पोलिस यंत्रणा तैणात करण्यात आली होती. यातून भाजप सत्तेचा कसा गैरवापर करत आहे दिसून आले आहे. देशात भाजप फोडा आणि सरकार स्थापन करा ही निती वापरत आहे त्याला आम्ही देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत लढा देण्याचे काम करणार आहोत. असे राऊत म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Assembly Election, Nana Patole, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician), Young Congress

  पुढील बातम्या