मुंबई 31 ऑक्टोबर : काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार बरखास्त करावं या मागणीसाठी राज्यपालांना भेटणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःच याबद्दलची माहिती दिली आहे. त्याचबरोबर या सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही नानांनी केला आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प ज्याप्रमाणे गुजरातला जात आहेत, त्याचप्रमाणे गुजरातचा डोळा मुंबईवर आहे. उद्या हे मुंबई देखील गुजरातला देतील असा गंभीर आरोप त्यांनी केला. अशाप्रकारे महाराष्ट्राला उध्वस्त करणारे शिंदे-फडणवीस सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी केला. दिवाळीच्या आनंद शिधामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी हवेच कशाला? त्यापेक्षा…, सुषमा अंधारेंचा सणसणीत टोला पटोले म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राज्यात शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळत नसेल तर सरकार काय करत आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कित्येक दिवसांपासून शेतकरी मदतीविना असल्याने तो टोकाचे पाऊल उचलत आहे. यामुळे हे सरकार बरखास्त करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यसरकारवही सडकून टीका केली. रॉबर्ट वाड्रांकडून राहुल गांधींची साईबाबांशी तुलना, भारत जोडो यात्रेला म्हणाले.. नाना पटोलेंची टाटा एअर बसवरूनही जोरदार टीका महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी-शाह यांनी ‘ईडी’चा वापर करून हे सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांचे सरकार आणले. राज्यात सरकार बदलल्यापासून केवळ तीन महिन्यांत वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प गुजरातला गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.