मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : पितृपक्षात साजरा होतो गणेशोत्सव, पाहा काय आहे ही परंपरा Video

Nagpur : पितृपक्षात साजरा होतो गणेशोत्सव, पाहा काय आहे ही परंपरा Video

Nagpur: नागपूरातील ऐतिहासिक भोसले वाड्यात पितृपक्षात गणेशोत्सव साजरा होतो. 235 वर्षांपासून साजरा होणाऱ्या या उत्सवाचं खास कारण आहे.

Nagpur: नागपूरातील ऐतिहासिक भोसले वाड्यात पितृपक्षात गणेशोत्सव साजरा होतो. 235 वर्षांपासून साजरा होणाऱ्या या उत्सवाचं खास कारण आहे.

Nagpur: नागपूरातील ऐतिहासिक भोसले वाड्यात पितृपक्षात गणेशोत्सव साजरा होतो. 235 वर्षांपासून साजरा होणाऱ्या या उत्सवाचं खास कारण आहे.

नागपूर, 20 सप्टेंबर : गतवर्षी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंधातून मुक्तता मिळाल्याने दोन वर्षांनंतर यंदाचा गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. प्रामुख्याने भारतभर भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा होतो. आजघडीला सर्वत्र गणेशोत्सवाची सांगता झालेली आहे. मात्र, नागपुरातील गणेशोत्सव अद्याप संपलेला नाही. नागपूरकर भोसले राजघराण्याच्या वतीने 235 वर्षापासून विदर्भाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवामध्ये भर घालणाऱ्या या गणेशोत्सवाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मराठा साम्राज्याची सीमा अटक पासून कटकपर्यंत होती हे आपण नेहमीच ऐकले, वाचले असेल. त्यातील कटक जिंकणारे पराक्रमी घराणे म्हणजे नागपूरचे नागपूरकर भोसले घराणे. याच घराण्याने पुढे महाराष्ट्रातील वऱ्हाड पासून पश्चिम बंगाल, ओडिसा, इत्यादींवर आक्रमण करून अन्यायाविरुद्ध समशेर उगारून मराठा साम्राज्याला बळ प्राप्त करून दिले. आणि 'सेनासाहेभ सुभा' हे मानाचे पद भूषविले. त्याचं नागपूरकर भोसल्यांचा नागपुरातील महाल भागात असलेल्या मोठा राजवाडा येथे दरवर्षी पितृपक्षात हाडपक्या गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.  रंजक इतिहास या उत्सवाच्या नावा मागे देखील रंजक इतिहास आहे. भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा झाल्यावर पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्षाला विदर्भातील बोली भाषेत हाडोक, हाडपोक, किंवा ‘हडपक’ असे म्हणतात. या काळात या गणपतीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने या गणपतीला भोसले काळापासून ‘हडपक्या गणपती’ असे संबोधले जाते. 'मस्कऱ्या गणपती' या नावानेही ओळख मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यापासून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पूर्वापार अनेक लोककला सादर करण्यात येतात. प्रामुख्याने लावणी, नकला, खडी गंमत इत्यादी अनेक थट्ट- मस्करीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत. या कार्यक्रमांना नागपुरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत. या मागील मुख्य धारणा अशी की, या लोककलेला राजाश्रय देऊन ही लोककला जपली जावी व समाजात एकता प्रस्थापित व्हावी. कालांतराने या थट्टा- मस्करीच्या  कार्यक्रमाहून या गणेशोत्सवाला स्थानिक बोलीभाषेतील 'मस्कऱ्या गणपती'  म्हणून देखील नाव प्रचलित झाले.  नवरात्रीत दिशेशी संबंधित या चुका करू नका, पूजा करताना हे नियम पाळा 1787 मध्ये गणपतीची स्थापना नागपूरकर भोसले घराण्यातील लढवय्ये सरदार श्रीमंत समशेर बहादूर राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू हे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बंगालच्या स्वारीवर गेले होते. तेथे विजय प्राप्त करून परत येत असताना कुळाचाराच्या घरगुती गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे बंगालवरील विजयोत्सव साजरा करण्यासाठी पितृपक्षात इ.स. 1787 मध्ये चिमणाबापू यांनी हडपक्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या उत्सवाची  परंपरा सुरू झाली. तेव्हापासून नागपुरातील भोसले घराण्यात दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. या गणपती बद्दल लोकांमध्ये अपार श्रद्धा असून नवसाला पावणारा गणपती म्हणून स्थानिक लोकांमध्ये लोकभावना आहे. विदर्भातील अनेक उत्सवाप्रमाणेच हडपक्या गणेश उत्सव पूर्व विदर्भात, भंडारा, गोंदिया, वर्धा इत्यादी ठिकाणच्या लोकांनी सार्वजनिक स्वरूपात हा सण देखील आपलासा केला. मूर्तीची उंची कमी केली भोसले राजवाड्यातील हडपक्या गणपतीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण व वेगळेपण म्हणजे भोसले घराण्यात चिमणाबापूंनी 12 हातांची, 21 फुटाची मूर्ती स्थापन केली होती. अनेक वर्षे याच प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. परंतु 2005 पासून मूर्तीची उंची कमी करण्यात आली. आता साडेतीन फुटांची मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येते. संकष्टी चतुर्थीला त्याची प्रतिष्ठापना केली जाते व दहा दिवसांनी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. या दहा दिवसांच्या दरम्यान खडीगंमत, लावण्या, भजन, पोवाडे, सुगम संगीत, हास्यकल्लोळ, जागरण, आनंद मेळावा यासारखे विविध लोककला प्रकार सादर केले जातात. दरवर्षी भोसले वाड्यात हा उत्सव अविरतपणे साजरा केला जातो. प्रतीक्षा संपली! 'या' दिवसापासून भाविकांना पाहता येणार सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप! VIDEO दहा दिवस विधिवत पूजा दहा दिवस दररोज संध्याकाळी सहा वाजता शहरातील मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा व गणरायांची आरती केली जाते. पुजेसाठी खालील आरती म्हटली जाते. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥ सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥ जय देव, जय देव सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामनापु्र्ती जय देव, जय देव रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुम केशरा। हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥ जय देव, जय देव दर्शनमात्रे मन कामनापु्र्ती, जय देव, जय देव जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामनापु्र्ती जय देव, जय देव रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा लंबोदर पीतांबर फणीवर बंधना। सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना। दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना॥ जय देव, जय देव येत्या 23/9 /२०२२ रोजी गणरायांचे विसर्जन करण्यात येणार आहे त्यापूर्वी आपण या वैशिष्ट्यपूर्ण गणेशाचे दर्शन घेऊ शकता. त्यासाठी पत्ता आहे महाल परिसरातील मोठा राजवाडा, नागपूर Senior Bhonsla Palace
गुगल मॅपवरून साभार
First published:

Tags: Nagpur, Nagpur News, गणपती, गणपती बाप्पा

पुढील बातम्या