नागपूर 09 डिसेंबर : राज्यातील अनेक भागांमध्ये थंडी वाढली आहे. अशात लोक थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करताना दिसतात. तर काही लोक शेकोटी पेटवून बसतात. मात्र, हीच गोष्ट एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. नागपुरातही तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. त्यामुळे एक महिला अंथरुणाजवळ शेकोटी पेटवून बसली होती. मात्र ही गोष्ट महिलेच्या जीवावर बेतली.
AC रिपेअर करायला आला अन् 5 वर्षीय चिमुकलीला लिफ्टमध्ये नेत..; तरुणाच्या कृत्यानं पनवेल हादरलं
हात शेकण्यासाठी या महिलेनं अंथरुणाजवळ शेकोटी पेटविली होती. मात्र, अंथरुणातून उठताना चक्कर येऊन त्या शेकोटीवर पडल्या. यावेळी शेकोटीतील जाळामुळे त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला. या घटनेत त्यांचा चेहरा आणि छाती जळाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
निमा यादव असं या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी -जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनंतर हिवाळ्यात शेकोटी पेटवून त्याजवळ बसणाऱ्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज आहे.
लातूरमधील व्यक्ती थंडी वाजत असल्याने रुळावर झोपला -
लातूरमधून एक अजब घटना समोर आली आहे. यात एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावरच झोपला. त्याचवेळी लातूर-मुंबई एक्सप्रेस रुळावरून जात होती. हे लक्षात येताच रेल्वेकर्मचाऱ्यांनी ट्रेन थांबवून या व्यक्तीला बाहेर काढलं. जेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला रेल्वेरुळावर झोपण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की थंडी वाजू लागली म्हणून रेल्वे रुळावर झोपलो होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Nagpur News