नागपूर, 6 ऑक्टोबर : हिंदुस्तानाच्या संघर्षमय इतिहासात अनेक राजवटी शस्त्रांच्या बळावर जन्माला आली, जगली आणि शस्त्र बळाअभावीच मातीमोलही झाली. रणांगणात वापरले गेलेली शस्त्र राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचं, क्रौर्याच आणि अविश्वसनीय अश्या शौर्याचा प्रतीक मानलं जातं. लैकिकी अर्थाने राजा शिवछत्रपतींच्या रूपात या देशाला फार मोठा जाज्वल्य इतिहास लाभला आहे. रणांगणावर पराक्रम गाजवलेल्या अशाच काही शस्त्रांचा संग्रह नागपुरातील एका शिवभक्ताने संग्रह केला आहे. हे शस्त्र प्रत्यक्ष हाताळण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे वास्तवरुपी शस्त्र आजही आपल्या इथं विजयादशमीला पुजले जातात. विजयादशमीला शिवकाळात फार महत्त्व होते. विजयादशमी नंतर राज्याच्या सीमा ओलांडून शत्रूंच्या सेनेवर आक्रमण करून विजय संपादन केला जातो. त्यांचेच प्रतीक म्हणून विजयादशमीला शस्त्रांचे फार महत्त्व आहे. शंभरहून अधिक शस्त्र ओंकार तलमले यांना लहानपणापासूनच शिवरायांच्या प्रती नितांत आदर आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन ओंकार आपलं आयुष्य जगतो. याच प्रेरणेतून ओंकारला शस्त्रावर विशेष प्रेम जडले. यातून ओंकारने शस्त्र संग्रह करण्याचा छंद जोपासला. या छंदातून ओंकारने शंभरहून अधिक शस्त्र जमवून संग्रही केले आहेत. त्यात प्रामुख्याने, तलवार, ढाल, ठासण्यांच्या बंदुकी, दांडपट्टा, घोड्यांवरील तोफ, कट्यार, भाले, बाण अशा शस्त्रांचा संग्रह आहे.
ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपारिक नृत्यासह विद्यार्थ्यांनी केला जागर, पाहा Video
प्रत्यक्ष हाताळता येणार शस्त्रे भारतभर अनेक ठिकाणी शस्त्र दालन, ऐतिहासिक वास्तू संग्रहालय तसेच, शस्त्रांचे खाजगी संग्रह आहेत. मात्र बहुतांशी लोकांना या शस्त्रास्त्रांना जवळून अनुभवता, हाताळता येत नसल्याने त्यांचे वजन, वैशिष्ट इत्यादी अनुभवता येत नाही. हीच उणीव लक्षात घेत ओंकारने सर्वसामान्यांपर्यंत शस्त्रामधील इतिहास, त्याचे वैशिष्ट्य आणि महत्त्व या माध्यमातून पोहचवण्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे ओंकारने सांगितले.
Ravan Dahan होताच गर्दीवर कोसळला रावणाचा पेटता पुतळा; दुर्घटनेचा धडकी भरवणारा LIVE VIDEO
पुरातन शस्त्र शस्त्र प्रदर्शनात गेंड्याच्या कातडीपासून तयार करण्यात आलेली ढाल, विविध प्रकारच्या ठासणीच्या बंदुका आहेत. हे शस्त्र अतिशय पुरातन असल्याचे ओंकार सांगतो. एकच तलवारीच्या म्यान मध्ये तलवार आणि कट्यार ठेवता येईल अशी सोय असलेली म्यान आहे. तसेच हरणाच्या कातडीची म्यान, शिव काळातील महत्त्वपूर्ण हत्यार वाघ नखे, असे विविध वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र या संग्रहाचे आकर्षण आहे. शस्त्र प्रदर्शन पत्ता ओंकार तलमले यांचे हे शस्त्र प्रदर्शन आपण खालील पत्त्यावर जाऊन बघू शकता. पत्ता. - वूडपिकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ब्लॉक नंबर सी- 25, हॉटेल विहार जवळ, एमआयडीसी वाडी नागपूर
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.