वर्धा, 5 ऑक्टोबर : मानव आणि वन्यजिवांमध्ये जगण्यातून संघर्ष निर्माण झाला आहे. यात पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे. निसर्गचक्र, निसर्गसौंदर्य कायम राखण्याकरिता वन्यजीव सप्ताहाचे आयोजन वर्ध्यात करण्यात आले. इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजअंतर्गंत पारंपारिक वेशभूषा परिधान करून जनजागृती रॅली काढण्यात आली. आदिवासी संस्कृती, वन्यजीव प्राणी, आणि निसर्ग प्रेम समजून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांची पारंपारिक पोशाख परिधान करून जनजागृती रॅली काढली. रॅलीत आदिवासी नृत्याचे देखील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. रॅलीचे उद्घाटन खासदार रामदास तडस, संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर आणि वनसंरक्षक राकेश सप्टेंबर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास डॉ.अभिजित वेरूळकर, प्राचार्य डॉ.आशिष ससनकर, आशिष गोस्वामी आदी उपस्थित होते. वन्यजीव सप्ताह साजरा इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजअंतर्गंत या रॅलीचे ओयोजन केले होते. सुमारे 1500 विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीतील ढोल, लेझीम, भजनाच्या दणदणाटाने परिसर दुमदुमून गेला. रॅलीत वन विभागाचे कर्मचारी, पीपल फॉर ॲनिमल्स सहभागी झाले होते. Dasara 2022 : दसऱ्याच्या पूजेसाठी शूभ मुहूर्त काय? आपट्यांच्या पानांना का आहे महत्त्व? वृक्ष पालखी आकर्षणाचे केंद्र रॅलीत वृक्षांची पालखी आकर्षणाचे केंद्र ठरली. पालखी हिरव्या पानाफुलांनी सजवली होती. पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी समाजव्यवस्थेचे पारंपरिक जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. विविध भाज्यांसह विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे वाचवा आदी घोषणा दिल्या. दिंडी महाविद्यालयातून आर्वी नाका येथे नेण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. आर्वी नाका येथील महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ.आर.जी.भोयर यांनी पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. वुमन्स डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव डॉ.अभिजित वेरूळकर यांनी विद्यार्थिनींना घरीच झाडे लावण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशिष ससनकर यांनीही मार्गदर्शन केले. आर्वी नाका परिसरात पांढऱ्या कपड्यावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. रॅली यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.