मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाग्यरेषा की मृत्यूरेषा? समृद्धी महामार्गावर कारचा भयानक अपघात,2 मुलांसह 3 महिलांचा जागीच मृत्यू

भाग्यरेषा की मृत्यूरेषा? समृद्धी महामार्गावर कारचा भयानक अपघात,2 मुलांसह 3 महिलांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

वेगात असलेली गाडी अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

उदय तिमांडे, प्रतिनिधी

बुलडाणा, 12 मार्च : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण असा अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारला अपघात झाला. या अपघातात 2 लहान मुलांसह 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा इथं मारुती सुझुकी आर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला. वेगात असलेली गाडी अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भरधाव वेगात असलेली आर्टिगा कार अचानक चालकाकडून अनियंत्रित झाली. त्यामुळे कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला.

(कालव्यात मृतदेहासह आढळली जळालेली कार, नेमकं काय प्रकरण? कोल्हापूर हादरलं)

या अपघातात तीन महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे.

धावत्या रिक्षावर चौथ्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड, मायलेकीचा मृत्यू

दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी पुर्वेकडे धक्कादायक अशी घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडली. यामध्ये रिक्षातून प्रवास करणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला. आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलीची उपचारावेळी प्राणज्योत मालवली.

(कारच्या धडकेत 5 महिन्याच्या चिमुकल्यासह आई 10 फूट उंच उडाली, थरारक अपघात)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी पूर्वेकडील वेस्टर्न एक्सप्रेसवेशेजारी असलेल्या सोनार चाळ परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथून सायंकाळी चारच्या सुमारास एक महिला तिच्या मुलीसह मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने जात होती. तेव्हा इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चौथ्या मजल्यावरून सळई थेट रिक्षावर पडली. ही घटना इतकी भीषण होती की, अपघतात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी झाली होती.

अपघातानंतर महिलेसह मुलीला ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. तिथे महिलेला मृत घोषित केले. तर मुलीचा उपचारावेळी मृत्यू झाला. दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सळई पडल्याने घडलेल्या या अपघातानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

First published:

Tags: Nagpur