जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / कारच्या धडकेत 5 महिन्याच्या चिमुकल्यासह आई 10 फूट उंच उडाली, थरारक अपघात

कारच्या धडकेत 5 महिन्याच्या चिमुकल्यासह आई 10 फूट उंच उडाली, थरारक अपघात

कारच्या धडकेत 5 महिन्याच्या चिमुकल्यासह आई 10 फूट उंच उडाली, थरारक अपघात

मध्यप्रदेशमधील इंदौर शहरात एक धक्कादायक अपघात घडला आहे.

  • -MIN READ Local18 Madhya Pradesh
  • Last Updated :

अभिलाष मिश्रा (इंदौर) 12 मार्च : मध्यप्रदेशमधील इंदौर शहरात एक धक्कादायक अपघात घडला आहे. यामध्ये एका पाच महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. हा भयानक अपघात एक महिला आपल्या 5 वर्षाच्या निरागस मुलासह रस्ता ओलांडत असताना घडला आहे. कार चालकाने महिलेला इतक्या वेगाने धडक दिली की आई आणि मुलगा दोघेही उडून 10 फूट अंतरावर पडले. या घटनेत 5 महिन्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली.

जाहिरात

या घटनेनंतर मयताच्या वडिलांनी कार चालकाचा तीन किमी दूर पाठलाग करून त्याला दुचाकीवरून पकडले. वडिलांसोबत मोठी मुलगी होती. लोकांनी जखमी आई व मुलाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केले. याचबरोबर आईची प्रकृती गंभीर असताना तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाग्यरेषा की मृत्यूरेषा? समृद्धी महामार्गावर कारचा भयानक अपघात,2 मुलांसह 3 महिलांचा जागीच मृत्यू

स्थानिक पोलिसांनी लहान बाळाचा पोस्ट मार्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना झालरिया येथील आहे. मोक्ष असे मृत मुलाचे नाव आहे. मयताचे वडील प्रदीप मुंडळे यांनी सांगितले की, मी व पत्नी दोघेही मजुरीचे काम करतो. ही घटना घडली त्यावेळी त्यांची पत्नी शीतल 3 वर्षांची मुलगी जिज्ञासा आणि 5 महिन्यांचा मुलगा मोक्ष होता. मोक्ष आईच्या मांडीवर मागे गाडीवर बसला होता.

जाहिरात

या अपघातात मुलगा मोक्ष राहिला नसल्याचे प्रदीप यांनी सांगितले, पत्नी शीतल ही गंभीर जखमी झाली असून त्यांच्या हाताला, पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर तेथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परदेशी महिलेशी विवाह केल्याने `या` भारतीय राजाला ब्रिटिशांनी केली होती शिक्षा; प्रेमकथा ठरली अनोखी

सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. चिमुकल्याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले आहे. या दरम्यान पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात