उदय तिमांडे, नागपूर 23 जुलै : सिर्सी हे उमरेड तालुक्यातील नामवंत गाव. या गावात फार मोठी लोकसंख्या असल्याने मोठा गाजावाजा असतो. या गावात दोन ते तीन देशी विदेशी दारूची दुकानंही आहेत.या गावात तळीरामांच्या सार्वजनिक ठिकाणी डुलक्या हा नेहमीचाच विषय आहे. पण आता इथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरली, शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी आले. वर्ग सुरू झाले. दरम्यान एका वर्गात कोणीच शिकवायला न आल्याने विद्यार्थी बाहेर भटकत होते. या प्रकाराकडे काही नागरिकांनी लक्ष दिलं आणि तपासणी केली तर एक शिक्षक वर्गखोलीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत विचित्र अवस्थेमध्ये दारू पिऊन झोपला असल्याचं समोर आलं. यशवंत श्रावण वासनिक (वय 54) असं मद्यपी शिक्षकाचं नाव आहे. हा शिक्षक सिर्सी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये सात महिन्यांपासून सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत चार वर्ग असून 150 विद्यार्थी आहेत. शाळेत एकूण सात शिक्षक आहेत . यशवंत हा नागपूरवरून अपडाऊन करतो, तो सिर्सीत येताच देशी दारूच्या दुकनात जाऊन दारू पिऊनच दररोज शाळेत जात असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर : सिर्सी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये दारू पिऊन झोपला शिक्षक, विद्यार्थी बाहेर फिरत राहिले pic.twitter.com/zOCvBNBlNz
— News18Lokmat (@News18lokmat) July 23, 2023
बरेचदा याबाबतीत वरिष्ठांना सूचनाही दिल्या गेल्या पण कोणीच लक्ष दिलं नाही. चक्क वर्गात तो दारू पिऊन झोपायचा पण याची कोणतीही माहिती शाळेबाहेर आलेली नव्हती. म्हणून दारू पिऊन शिकवणे, शाळेतच झोपणे आणि शाळा परीसरात दारू पिऊन धिंगाणा घालणे हा या शिक्षकाचा रोज चालत असलेला प्रकार काही सूजान नागरिकांच्या लक्षात आला. पण शाळेत जाऊन कोणीही या गोष्टीचा जाब विचारला नसल्याने तो अजूनही दारू पिऊन धिंगाणा घालत होता. Online Gaming Scam: घरात सापडली तब्बल 10 कोटींची रोकड, पैसे मोजता मोजता अधिकारी थकले, नेमकं काय प्रकरण? शनिवारी सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास शाळेच्या आवारात कोणीतरी दारूच्या नशेत धिंगाणा आणि शिवीगाळ करत असल्याचं महादेव शेरकुरे सिर्सी यांच्या लक्षात आलं. त्यांनी हा प्रकार बघितला आणि लगेच ग्रामपंचायत सदस्य मनोज प्रेमदास दांदडे यांना फोनवर माहिती दिली. त्यांनी शाळेत जाऊन पाहणी केली असता हा शिक्षक एका चटईवर डुलक्या देत दारू पिऊन झोपलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर सिर्सी पोलीस चौकीत याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. शिक्षकावर बेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात शाळेच्या मुख्याधापकांशी संपर्क साधला असता मी दोन दिवसाच्या सुट्टीवर आहे. मी प्रभारी मुख्याध्यापक यांना झालेल्या प्रकाराची माहिती विचारतो, असं त्यांनी सांगितलं. या घडलेल्या प्रकारात या शिक्षकावर बेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणे आणि शांतता भंग करणे यासाठी कलम 84,10,12,17 मा.पो.का.अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेला पोलीस करत आहेत.