जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Online Gaming Scam: घरात सापडली तब्बल 10 कोटींची रोकड, पैसे मोजता मोजता अधिकारी थकले, नेमकं काय प्रकरण?

Online Gaming Scam: घरात सापडली तब्बल 10 कोटींची रोकड, पैसे मोजता मोजता अधिकारी थकले, नेमकं काय प्रकरण?

घरात सापडली तब्बल 10 कोटींची रोकड

घरात सापडली तब्बल 10 कोटींची रोकड

Online Gaming Scam: फोननंतर आता गेमिंग वेबसाइटचा वापर करून नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघड झाला आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 22 जुलै : देशात लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या युक्त्या वापरून हॅकर्स नागरिकांच्या बँक अकाऊंटमधून हजारोंची लूट करत आहेत. तर दुसरीकडे ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून दिवसाढवळ्या लुबाडले जात आहे. अशीच एक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एकदोन लाख नाही तर तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. हे रॅकेट देशभर पसरले असल्याची माहिती मिळत आहे. काय आहे प्रकरण? नागपुरात एका प्रकरणाने खळबळ उडाली आहे. ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका व्यावसायिकाची लोकांची 58 कोटी रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. आरोपीने ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कामविण्याचे आमिष दाखवले होते. केसिनो, रमी, तीन पत्ते, क्रिकेट अशा प्रकारच्या गेम खेळून पैसे कमावण्याचे आमिष लोकांना दिले. गोंदियाच्या अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याने ही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या अ‍ॅपच्या लिंकमध्ये सेटिंग मॅन्युपुलेट केलेली होती. ‘डॉक्टर्ड’ अ‍ॅप अशा पद्धतीने तयार केले होते की त्यात खेळणारा हरत जातो. या प्रकरणातील आरोपी फरार असून तो दुबईला पळून गेल्याची माहिती आहे. आरोपीच्या घरातून 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. या अ‍ॅपची लिंक केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. वाचा - एका कन्डोमने तरुणाला 20 वर्षाची शिक्षा, दार उघडताच आई सुन्न…नक्की काय घडलं? लोक कसे फसले जाळ्यात? आरोपी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याने साथीदारांच्या मदतीने लोकांना ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपवर 24 तास बेटींग खेळून कोट्यवधी रुपये कमवून देतो, असं आमिष दाखवलं. ऑनलाईन बेटींगचे युजरनेम आणि पासवर्ड पाठवून दिलेले पॉईंट परत येणार नाही, असं सांगून गेमिंग खेळायला भाग पाडलं. याने तक्रारदार यांना ऑनलाईन बेटींगची सवय लावली. मात्र, तक्रारदार या खेळात हरतच गेले. शेवटी गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी उधार पैसे घेऊन बेटींग करत राहिले. मात्र, हाती काहीच लागले नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आलं. मित्रांकडून उधार घेतलेले पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या गेममध्ये तकारदार यांची 58 कोटी 42 लाख 16 हजार 300 रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात