नागपूर, 10 ऑक्टोबर : कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन अप्रतिम कलाविष्कार घडू शकतो. याचा प्रत्यय म्हणजे नागपुरातील तरुणाने सुरू केलेला स्टार्टअप आहे. लेझर कटिंगच्या साहाय्याने लाकडाच्या विविध कलाकृती, अप्रतिम शोभेच्या वस्तू तयार करण्याचे काम हा तरुण करतो. ओंकार तलमले असे या तरुणाचे नाव आहे. या कलाकृती पूर्णपणे पर्यावरण पूरक आणि माफक दरात उपलब्ध आहेत. आता दिवाळीनिमित्त देखील काही कलाकृती साकारल्या असून त्याला भारतासह परदेशात देखील मागणी होत आहे. काहीतरी भन्नाट आणि विधायक काम आपल्या हातून व्हावे, अशी ओंकारची इच्छा होती. त्यातून कृतिशील ओंकारने एक वर्षापूर्वी हिंगणा एमआयडीसी येथे वूडपिंकर नावाने एक कंपनीचा शुभारंभ केला. लेझर कटिंग उपकरणाच्या अद्ययावत मशीनबद्दल पूर्ण माहिती मिळवली. या मशीनच्या साह्याने हवी ती डिझाइन तयार करून विविध कला आविष्कार कंपनीतून तयार होऊ लागले. दरम्यान अनेक आव्हानं उभी असताना ओंकारने जिद्द न सोडता काम केले. ऑनलाईन देखील विक्री ओंकारने तयार केलेल्या वस्तूचे अनेक ठिकाणी कला प्रदर्शन, उद्योजक मेळावे झाले. तसेच सोशल मीडिया, ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून या वास्तूंची मार्केटिंग करून विक्री केली जात आहे. लोकांनीही या वस्तूंना अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. आज या वास्तूंची मोठी मागणी होत असून परदेशातही अनेक वास्तूंची मागणी होत असल्याची माहिती ओंकारने दिली.
या भन्नाट वस्तूंची निर्मिती ओंकारच्या वूडपिकर कंपनीत लाकूड, मार्बल, अक्रलिक शीट वर हवी ती डिझाईन कोरून अप्रतिम कलाकृती निर्माण केली जाते. प्रामुख्याने अयोध्येतील राम मंदिर, केदारनाथ मंदिर, महाभारत रथ, शिवजन्म स्थान, काशी विश्वेश्वर, सुवर्ण मंदिर, अनेक टेबल लॅम्प, झुंबर, वॉल हँगिंग, की हँगिंग, लाकडी मूर्ती, विविध प्रकारच्या बॉक्स, लाकडी ग्रीटिंग कार्ड, लग्नपत्रिका, इत्यादी नानाविध कलाकृती तयार केल्या जातात. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार देखील हवी ती कलाकृती तयार करून दिली जाते. Success Story : नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी उभारली ‘टिश्यू कल्चर लॅब’, पाहा, VIDEO दिवाळी निमित्त आकर्षक कंदील दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारच्या कंदील देखील ओंकारकडे उपलब्ध झाले आहेत. यासह भेटवस्तू देखील येथे माफक दरात उपलब्ध आहेत. ध्येयापासून विचलित न होता प्रयत्न करणे आवश्यक ओंकारच्या स्टार्टअपची दखल घेऊन आत्तापर्यंत अनेकांनी ओंकारचे कौतुक देखील केले आहे. तसेच ओंकारच्या वूडपिकर नावाने आलेल्या उद्योगाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहे. महत्त्वाकांक्षी स्वप्न बघून ते प्रत्यक्षात घडवण्यासाठी ध्येयापासून विचलित न होता सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिले पाहिजे, असा संदेश ओंकार देतो.